महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक जिल्ह्यात गावठी दारूचे अड्डे उद्धवस्त, आचारसंहितेच्या काळात पोलिसांची धडक कारवाई - NASHIK POLICE NEWS

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक मधील घोटी पोलिसांनी कठोर पावले उचलत गावठी दारूच्या हातभट्यांवर कारवाई केली. यावेळी लाखो रुपयांची दारू आणी साहीत्य नष्ट करण्यात आले.

नाशिक जिल्ह्यातील गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त

By

Published : Sep 23, 2019, 10:39 AM IST

नाशिक - आगामी विधानसभा निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक आरती सिंग यांच्या आदेशाने घोटी पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. घोटी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मोरधन किल्ल्यावर तब्बल तीन गावठी हातभट्या उद्धवस्त केल्या आहेत. लाखो रुपयांचे रसायन आणि गावठी यावेळी दारू नष्ट केली.

आगामी विधानसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार घोटी पोलिसांनी ठाण्याच्या हद्दीतील खैरगाव शिवारात गावठी दारू तयार करण्याच्या मोठ्या प्रमाणात हातभट्ट्या असल्याची गुप्त माहिती पोलिसांना समजली होती. यावरून पोलीस निरीक्षक जलींदर पळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल धुमसे, शितल गायकवाड, मथुरे आदींच्या पथकाने या डोंगरावर भल्या पहाटे कारवाई करत तीन हातभट्ट्या उद्धवस्त केल्या. यात तब्बल चार लाखाची घातक रसायने आणि मुद्देमाल नष्ट करण्यात आला. पोलिसांनी एका संशयिताला या प्रकरणी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या या मोहिमेचे सर्वत्र कौतुक होते आहे. निवडणूकी नंतर सुद्धा पोलिसांनी ही कारवाई अशाच प्रकारे चालू ठेवावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details