नाशिक -मैत्रिणीसोबत रस्त्याने पायी चाललेल्या अल्पवयीन मुलीचा तिघा संशयितांनी ( minor girl Molestation ) विनयभंग केल्याची घटना म्हसरूळ पोलीस ( Mhasrul Police Station Nashik ) ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीनुसार म्हसरूळ पोलीस ठाण्यात तिघा संशयितांवर ( case has been registered against three suspects ) विनयभंग आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात ( Police arrested two suspects ) घेतले आहे. एकजण अद्याप फरार असून, त्यालाही लवकरच ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Minor Girl Molestation Nashik : नाशकात रस्त्याने जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात - मुलीचा विनयभंग करणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
अल्पवयीन मुलीचा तिघा संशयितांनी ( minor girl Molestation ) विनयभंग केल्याची घटना म्हसरूळ पोलीस ( Mhasrul Police Station Nashik ) ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीनुसार म्हसरूळ पोलीस ठाण्यात तिघा संशयितांवर ( case has been registered against three suspects ) विनयभंग आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![Minor Girl Molestation Nashik : नाशकात रस्त्याने जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात म्हसरूळ पोलीस ठाणे](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15067851-thumbnail-3x2-a.jpg)
म्हसरूळ परिसरातून मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पीडित मुलगी मैत्रिणीसोबत पायी चालली होती. त्यावेळी अचानक पीडितेच्या भावाच्या ओळखीचा एक जण त्याच्या अन्य दोन मित्रांसोबत तेथे आला व पीडितेला थांबवले. ओठांना एवढी लिपस्टिक का लावतेस, असे म्हणून त्याने व अन्य एकाने पीडितेचे दोन्ही हात पकडले. त्यामुळे संतापलेल्या पीडितेने दोघांचे हात झटकून स्वत:ला सोडवले. पीडितेने थेट म्हसरूळ पोलीस ठाणे गाठत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तक्रार नोंदवत तिघा संशयितांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी काही तासांतच तिघांपैकी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरु आहे.