महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Police Arrested Drunk Professor : सर्दी खोकल्यावर ब्रॅंडीचा उपचार अंगलट ; अपघात केल्याने प्राध्यापकाची तुरुंगात रवानगी - drunk professor driving car In Nashik

नशेत कार चालवत इतर वाहन चालकांना उडवणाऱ्या प्राध्यापकाची (Police Arrested Drunk Professor) मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सर्दी खोकला जात नसल्याने ब्रँडी पिण्याचा सल्ला कोणीतरी दिला आणि कधी सुपारी देखील न खाणाऱ्या प्राध्यापकाने थेट पाण्यासारखी ब्रॅंडी प्राशन केली. त्यानंतर नशेत कार चालवत पाच ते सहा जणांना धडक (professor driving car Five to six people hit) दिली.

Police Arrested Drunk Professor
दारूच्या नशेत कार चालवणाऱ्या प्राध्यापकाला अटक

By

Published : Nov 21, 2022, 11:16 AM IST

नाशिक : नशेत कार चालवत इतर वाहन चालकांना उडवणाऱ्या प्राध्यापकाची (Police Arrested Drunk Professor) मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सर्दी खोकला जात नसल्याने ब्रँडी पिण्याचा सल्ला कोणीतरी दिला आणि कधी सुपारी देखील न खाणाऱ्या प्राध्यापकाने थेट पाण्यासारखी ब्रॅंडी प्राशन केली. त्यानंतर नशेत कार चालवत पाच ते सहा जणांना धडक (professor driving car Five to six people hit) दिली. ब्रॅंडीचा हा सल्ला प्राध्यापकाच्या करिअरवर बेतला असून त्यामुळे त्याला नोकरी देखील गमावावी लागलेली आहे.


ब्रँडी घेण्याचा सल्ला :नाशिक येथील महाविद्यालयात कॉमर्स शाखेची प्राध्यापक असलेले संशयित साहेबराव निकम यांना सर्दी खोकल्याचा त्रास होत होता. सर्दी कमी होत नसल्याने कोणी तरी त्यांना ब्रँडी घेण्याचा सल्ला दिला. कॉलेज सुटल्यानंतर कारमध्ये त्यांनी ब्रँडीची बाटली पाण्यासारखी पीत खाली केली. प्रथमच मद्यप्राशन केल्याने त्यांची शुद्ध हरपली. या स्थितीत कार चालवत उपनगर नाका येथे एकाला धडक (Police arrested drunk professor driving car) दिली.

दारूच्या नशेत कार चालवणाऱ्या प्राध्यापकाला अटक

गुन्हा दाखल :भीतीपोटी कार वेगाने चालवल्यानंतर दुभाजकाला कार धडकली. कारचे समोरचे टायर फुटले, तरी कार वेगात चालवत चार ते पाच दुचाकीला धडक दिली. या घटनेत एकाचे दोन्ही पाय निकामे झालेत. संशयित साहेबराव निकम यांच्या विरोधात मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसानंतर साहेबरावाची नशा उतरल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयातून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात (drunk professor driving car) केली.

ABOUT THE AUTHOR

...view details