नाशिक - मुंबई-आग्रा महामार्गावरील मालेगावच्या टेहरे फाट्याजवळ पोलिसांनी पशुखाद्याच्या ट्रकवर छापा टाकला. या छाप्यात 497 बॉक्स अवैध विदेशी मद्यसाठ्यासह 38 लाख 663 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नाशिकमध्ये पशुखाद्याच्या ट्रकमधून अवैध मद्यासाठा जप्त, ग्रामीण पोलिसांची कारवाई - पशुखाद्याच्या आडून मद्यतस्करी
मुंबई-आग्रा महामार्गावरील मालेगावच्या टेहरे फाट्याजवळ पोलिसांनी पशुखाद्याच्या ट्रकवर छापा टाकला. या छाप्यात 497 बॉक्स अवैध विदेशी मद्यसाठ्यासह 38 लाख 663 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा
पशुखाद्याच्या गोण्यांच्या आड मद्यसाठा लपवून चोरटी वाहतूक सुरू होती. मुंबई-आग्रा महामार्गावरील टेहरे फाट्याजवळील हॉटेल राजधानीसमोर पशुखाद्याच्या ट्रकवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत आयबी, सिग्नेचर, 100 पायपर, बिअर, विदेशी मद्य व देशी दारू असे एकूण 447 बॉक्स मद्यासाठा व मालट्रक, जनावरांचे पशुखाद्य, रोख रक्कम व मोबाईल फोन असा एकूण 38 लाख 663 रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईनंतर मालेगावच्या छावणी पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.