नाशिक - कोरोना प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी राज्य सरकारने नागरीकांना घरीच राहून नववर्षाचे स्वागत करण्याचे आवाहन केले होते. नाशिकमध्ये 31 डिसेंबरला रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पोलिसांकडून नाइट कर्फ्यु लावण्यात आला होता. यावेळी नाशिककरांनीदेखील नववर्षाचे स्वागत घरातच राहून केले.
नाशिकमध्ये नाइट कर्फ्युत फक्त 5 जणांवर पोलीस कारवाई - nasik night curfew
नाशिकध्ये 31 डिसेंबरला रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पोलिसांकडून नाइट कर्फ्यु लावण्यात आला होता. नागरिकांनी देखील या कर्फ्यूचे काटेकोरपणे पालन केले. शहरात अवघ्या पाच जणांवर ड्रिंक अँड ड्राइव्ह आणि कलम 142 कलम 122 प्रमाणे कारवाई करण्यात आली.
नाशिककरांचा नववर्षाच्या स्वागतासाठी संयम
हेही वाचा -'संभाजीनगर'च्या मुद्यावरून राजकारण तापले