नाशिक - मुखमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने आज (गुरुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये येत आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री यावेळी उपस्थित राहतील. यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल हे स्वतः शहरामध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी पोलीस महानिरीक्षकांकडून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत सूक्ष्म नियोजनाच्या सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे नागरिकांना साधी पिशवी घेऊन जाण्यासही मनाई करण्यात आली आहे.
मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर शहरासह जालना, सांगली, जळगाव, धुळे या जिल्ह्यातील सुमारे बारा बॉम्ब स्कॉड पथके नाशिकमध्ये दाखल झाली आहेत. नागरिकांना मोबाईल वगळता कोणतीही वस्तू सोबत बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे.
हेही वाचा -राणे 'वेटिंग'वरच राहतील; गृहराज्यमंत्री दिपक केसरकरांचा टोला
तर या पथकाच्या जवानांनी सभा स्थळाचा ताबा घेतला आहे. सभा स्थळांसह सर्व आजूबाजूचा परिसर पिंजून काढला आहे. मोदींसह सर्व महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी चोखपणे पार पडताना सुरक्षायंत्रणा दिसून येत आहे. सुरक्षेसोबत गर्दीचे नियोजन करण्यासाठी 5 हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. सभेच्या ठिकाणी मोदी यांच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा दल कमांडो एसजीपी तुकडी तैनात करण्यात आली आहे. तसेच राज्य राखीव दलाची तुकडी, जलद प्रतिसाद पथकाची जवान, दंगल नियंत्रण पथक यांचा समावेश आहे.