नाशिक - हमें नया कश्मीर बनाना है, हर काश्मीरी को गले लगाना है, और हमें वहां फिर से स्वर्ग बनाना है, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज उपस्थितांची मने जिंकली. महाजनादेश यात्रेच्या समारोप कार्यक्रमात नरेंद्र मोदी नाशिकमध्ये बोलत होते. तसेच कलम ३७० हटवणे ही फक्त सरकारची इच्छा नव्हती, तर १३० कोटी भारतीयांची इच्छा होती, असेही मोदी यावेळी म्हणाले.
हमें नया कश्मीर बनाना है, मोदी बोलले लोक उसळले - महाजनादेश यात्रेच्या समारोप नाशिकमध्ये
हमें नया कश्मीर बनाना है, हर काश्मीरी को गले लगाना है, और हमें वहां फिर से स्वर्ग बनाना है, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज उपस्थितांची मने जिंकली. महाजनादेश यात्रेच्या समारोप कार्यक्रमात नरेंद्र मोदी नाशिकमध्ये बोलत होते.
नरेंद्र मोदी
भाजपच्या महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा आज समाप्त झाला. या यात्रेचा समारोप आज नाशिकमध्ये पार पडला. यावेळी पंतप्रधान बोलत होते. ३७० कलम हटवण्याचा निर्णय जम्मू-कश्मीरच्या हिताचा आहे. भारताच्या जनतेला एकत्र करणारा आहे. कश्मीरच्या सगळ्या समस्या आम्हा सोडवायच्या आहेत. जम्मू-कश्मीरमध्ये हिंसा करण्याचे प्रयत्न काही घटक करत आहेत. मात्र, आम्ही हिंसेचा कट कधीही यशस्वी होऊ देणार नसल्याचे मोदी म्हणाले.