महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या रामभूमीतून फोडणार लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ - पंतप्रधान नरेंद्र मोदी

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 12 जानेवारीला मुंबईसह नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकांच्या (lok Sabha Election) प्रचाराचा नारळ फोडणार असल्याची चर्चा आहे. नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.

PM Narendra Modi
पंतप्रधान मोदी

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 4, 2024, 5:44 PM IST

Updated : Jan 4, 2024, 6:31 PM IST

नाशिक PM Narendra Modi : नाशिकमध्ये केंद्र सरकारच्या वतीनं स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त 'राष्ट्रीय युवा महोत्सवा'चं आयोजन करण्यात आलं आहे. 12 ते 16 जानेवारी दरम्यान हा महोत्सव होणार आहे. यावेळी 12 जानेवारीला चार किलोमीटरचा रोड शो करत पंतप्रधान मोदी स्वतः या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा नारळ नाशिकच्या रामभूमीतून फोडणार असल्याची चर्चा आहे. याबाबत भाजपाकडून अधिकृत दुजोरा अजून देण्यात आला नाही.




ओझर विमानतळावर पंतप्रधानांचं आगमन :नाशिकमध्ये 12 ते 16 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. ओझर विमानतळावर पंतप्रधानांचं आगमन झाल्यानंतर तेथून हेलिकॉप्टरनं ते नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुल येथे आगमन होईल. हेलिपॅड ते तपोवन सभा स्थळापर्यंत त्यांचा रोड शो होणार आहे. दीड तासाच्या दौऱ्यात व्यासपीठावर पंधरा मिनिटांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. विकसित भारत 2047 या संकल्पनेवर आधारित 'युवको के लिये युवको द्वारा' अशी या कार्यक्रमाची संकल्पना असणार आहे.



स्टार्टअपचं सादरीकरण : स्टार्टअप सादरीकरण, एक्स्पो फूड फेस्टिव्हल महोत्सवात तपोवन निलगिरी बागेत होणार आहे. ज्याद्वारे महाराष्ट्राची खाद्य संस्कृती तसंच स्टार्टअप प्रकल्पाचं सादरीकरण होईल, शेकरू प्राण्याच्या बोधचिन्हाद्वारे महाराष्ट्राचं ब्रँडिंग करण्यात येणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं.



म्हणून मोदींचं शक्तिप्रदर्शन : महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघावर भाजपाने लक्ष केंद्रीत केलं असून, त्यासाठीच शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सोबत घेतलं आहे. या दोन्ही गटांच्या जोरावर राज्यात सत्ता मिळवली असली, तरी लोकसभेत या दोन्ही गटांना सोबत घेऊन कितपत यश मिळेल याबाबत भाजपामध्येच साशंकता आहे. त्यामुळं भाजपाने आता राज्यात थेट मोदींनाच उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकची निवड करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या माध्यमातून मोदी नाशिकमध्ये शक्तिप्रदर्शन करणार आहेत. त्यांचा शहरात रोड शो करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत.


हेही वाचा -

  1. धृतराष्ट्राच्या भूमिकेतून उद्धव ठाकरे यांनी बाहेर यावे - नितेश राणेंचा सल्ला
  2. "ठाण्याचा विकास मोदींमुळं रखडला", 'ईटीव्ही भारत'च्या निवडणूक चर्चासत्रात विरोधकांचा आरोप
  3. "लोकसभेला 45 खासदार तर विधानसभेला 225 जागा जिंकू," चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा
Last Updated : Jan 4, 2024, 6:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details