महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शैक्षणिक विकास जाणण्यासाठी पंतप्रधान मोदींनी साधला आदिवासी विद्यार्थ्यांसोबत संवाद - मोदींची आदिवासी विद्यार्थ्यांशी भेट

Modi Visited Tribal Student: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवारी) कावनई येथील (Tribal Students) रहिवासी आणि पिंप्री सदो येथील एकलव्य विद्यालयातील (PM Modi) नववीतील विद्यार्थिनी कु. भारती रण आणि तिचे शिक्षक भाऊसाहेब रण यांच्याशी संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती घेतली. निमित्त होते प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान अर्थात पी. एम. जनमन अंतर्गत योजनांच्या लाभार्थ्यांशी प्रधानमंत्री मोदी यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे साधलेल्या संवादाचे.

PM Modi interacted with Bharti
भारती

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 15, 2024, 11:01 PM IST

विद्यार्थिनी कु. भारती रण आणि तिचे शिक्षक भाऊसाहेब रण कार्यक्रमात उपस्थिती दर्शविताना

नाशिकModi Visited Tribal Student:भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी कु. भारती रण आणि भाऊसाहेब रण यांना मिळालेल्या शैक्षणिक योजनांच्या लाभाबाबत विचारणा केली. (Educational Devp of Tribals) तसेच पी. एम. जनमन अंतर्गत लाभ मिळालेल्या अन्य योजनांबद्दलही माहिती घेतली. त्यांनी सांगितले की, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी एकलव्य विद्यालयांची संख्या वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. (PM Janmat) तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून आदिवासी बांधवांसाठी सुरू असलेल्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी एकलव्य विद्यालयांचा लाभ घेऊन या माध्यमातून त्यांची स्वप्नं पूर्ण करावीत, असं देखील आवाहन त्यांनी केलं.


वंचितांपर्यंत योजना पोहोचवल्या:अतिमागास भागातील आदिवासी बांधवाना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीनं विविध माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. त्याचप्रमाणे आदिवासी बांधवांच्या मुलांना उत्तम गुणवत्तेच्या शिक्षणासाठी एकलव्य विद्यालयाच्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत. विकसित भारत संकल्प यात्रेतून वंचितांपर्यंत योजना पोहोचविल्या जात आहेत. आदिवासी बांधवांच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या वतीनं मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सिकलसेल आजारावर वेळीच औषधोपचार करून त्याबाबत जनजागृती करण्यात यावी. रामजन्म भूमी पूजनाच्या माध्यमातून मंदिर स्वच्छतेचा संदेश सर्वत्र पोहचवून त्यासाठी सर्वांनी काम करावं, असं आवाहन केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केलं.


आदिवासी बांधवांच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य:पी. एम. जनमन महा अभियानाच्या माध्यमातून कमी वेळेत आदिवासी बांधवांना योजनांचा लाभ मिळत आहेत. आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. तसेच आवास योजनेचा निधी वाढवून देण्यासाठी देखील केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. घरकुल योजना 100 टक्के राबविण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. कातकरी बांधवांचे स्थलांतर थांबवित त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्याचा त्यांनी लाभ घ्यावा, असं आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित म्हणाले.

'या' लाभार्थ्यांना केले योजनांचे लाभ वाटप:
1) MSEB नवीन वीज कनेक्शन:भाऊसाहेब पांडुरंग रन, कल्पना आनंदा वाघ, नामदेव लक्ष्मण गावित, सुरेश खंडू वाघ, सखाराम देवराम मुकणे, ज्ञानेश्वर नामदेव वाघ, मंदाबाई बुधा हिलम, नारायण सोमा वाघ, अलका गंगाराम वाघ, एकनाथ पालू मुकणे

2) रेशनकार्ड वाटप:विठ्ठल देवराम हिलम, संतोष पांडुरंग रन, विलास नारायण रन, पिंटु पंढरी हिलीम, नारायण दामू रन, द्रौपदा भाऊ कवर, अंकुश किसन रन, प्रकाश पांडुरंग रन

3) जात प्रमाणपत्र वाटप:देवराम एकनाथ चौरे, रोहिदास भगवंत हिलम, दत्तु पांडु वाघ, विठ्ठल नामदेव हिलम, पद्मा शांताराम हिलम, बाळु भिवा हिलम, मंदाबाई बुधा हिलम, राजाराम बाळु वाघ, अलका शंकर दिवे, वसुंधरा पिंटु मुकणे

4) आयुष्यमान कार्ड वाटप:मनोहर आनंदा वाघ, सोनाली अंकुश रन, कमल पांडुरंग हिलम, फुलाबाई एकनाथ मुकणे, किसन सोमनाथ, दिवे, सविता विठ्ठल वाघ

5) पी. एम. सन्मान निधी योजना लाभ:पप्पु नाना पवार, सान्याबाई लक्ष्मण वाघ, किसन सोमा हिलम, हरी सिताराम वाघ, वामन झिपा मुकणे

हेही वाचा:

  1. राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधात शिंदे गटाची उच्च न्यायालयात धाव, जाणून घ्या काय आहे प्रकरण
  2. धारावीकरांना मिळणार साडेतीनशे चौरस फुटांची घरं; स्वतंत्र शौचालय आणि स्वयंपाकघर असणार
  3. भाजपा-संघ परिवाराची महत्वाची बैठक; लोकसभा, विधानसभा निवडणुकांची 'स्ट्रॅटेजी' ठरली?

ABOUT THE AUTHOR

...view details