दिंडोरी(नाशिक) - जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील चाचडगाव येथे एक मित्र एक वृक्ष या सोशल मीडिया ग्रुपच्या संकल्पनेतून व राजपथ इंफ्राकाॅन प्रा. ली. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चाचडगावच्या स्मशानभूमीच्या सव्वा एकर जमीनवर ७ जूनला वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी स्मशानभूमी परीसरात वड, पिंपळ, नांद्रुक, शिसम, सोनमोहर, सोनचाफा, चिंच, विलायती चिंच या प्रकारची सुमारे शंभर झाडे लावण्यात आले. तसेच वृक्ष संरक्षणार्थ जाळी व अंतर्गत माशागत करण्यात आली.
दिंडोरी तालुक्यात एक मित्र एक वृक्ष या संकल्पनेतून १०० वृक्ष लागवड
प्रत्येक गावातील स्मशानभूमीत दशक्रियांसाठी नागरीकांना बसण्याची व्यवस्था नसते. उन्हात बसावे लागते. त्यामुळे एक मित्र एक वृक्ष, असा सोशल मीडियावर ग्रुप तयार करून त्याची लिंक फारवर्ड केली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक वृक्षप्रेमीनी सहभाग घेतला व वृक्षरोपणास सुरुवात केली.
प्रत्येक गावातील स्मशानभूमीत दशक्रियांसाठी नागरीकांना बसण्याची व्यवस्था नसते. उन्हात बसावे लागते. त्यामुळे एक मित्र एक वृक्ष, असा सोशल मीडियावर ग्रुप तयार करून त्याची लिंक फारवर्ड केली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक वृक्षप्रेमीनी सहभाग घेतला व वृक्षरोपणास सुरुवात केली. आदिवासी बहूल भागातील वृक्षरोपण सुरवात केली असून संपूर्ण महाराष्ट्रात वृक्ष लागवड करण्याचा आमच्या ग्रुपचा मानस असल्याचे सुनील पाटील पेलमहाले यांनी सांगीतले. यावेळी किरण भोये तात्या, उपसरपंच देवीदास पगारे, रमेश भागवत, पोपट पालवी, कैलास पेलमहाले, संदेश आंबेकर, नंदू पेलमहाले, दामु गावंढे, छबू गायकवाड, गोरखनाथ पेलमहाले, ज्ञानेश्वर पेलमहाले, आनंदा पेलमहाले व चाचडगाव येथील ग्रामस्थ एक एक झाड दत्तक घेतल्याचे सुनील पाटील पेलमहाले यांनी सांगितले.