येवला (नाशिक) - शहरातील लोणार गल्ली भागात होळीत कोरोना राक्षसाचे चित्र लावून होळी दहन करण्यात आली. सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोनाचा लवकर नायनाट व्हावा यामुळे स्थानिक नागरिकांनी होळीत कोरोना राक्षसाचे हे चित्र दहन केले आहे.
नियमांचे पालन करत सण साजरा
येवला शहरासह तालुक्यात होळी सण हा दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो. यंदा मात्र कोरोनाचे सावट असल्याने शासकीय नियमाचे काटेकोरपणे पालन करत होळी सण साजरा करण्यात आला.
येवल्यात होळीमध्ये जाळले कोरोना राक्षसाचे चित्र - होळीत जाळले कोरोना राक्षसाचे चित्र
शहरातील लोणार गल्लीत दरवर्षी मोठ्या प्रमाणात होळी सण साजरा केला जातो. मात्र यावेळी साध्या पद्धतीने हा सण साजरा केला जात असला तरी होळीवर कोरोना विषाणूचे चित्र लावून होळीमध्ये ते दहन करण्यात आले.
कोरोना राक्षस दहन
शहरातील विविध भागात होळी पेटविण्यात आली. यावेळी शहरातील लोणार गल्लीत दरवर्षी मोठ्या प्रमाणात होळी सण साजरा केला जातो. मात्र यावेळी साध्या पद्धतीने हा सण साजरा केला जात असला तरी होळीवर कोरोना विषाणूचा चित्र लावून होळीमध्ये ते दहन करण्यात आले. होळी पेटवल्यानंतर 'जळून जाईल व कोरोनाचा नायनाट होईल',अशा घोषणाही देण्यात आल्या. शिवाय कोरोना जनजागृतीचा संदेश यावेळी देण्यात आला.