महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nashik Crime News : मध्यरात्री रेल्वे स्थानकावर थांबणे पडले महागात; विवाहितेवर अत्याचार - नाशिक क्राईम न्यूज

मध्यरात्री रेल्वे स्थानकावर थांबण्याचा निर्णय विवाहितेला महागात पडला आहे. विवाहितेची दिशाभूल करत दोन नराधमांनी तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिकमध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Jun 23, 2023, 11:58 AM IST

नाशिक - पीडिता ही नवसारी येथून नाशिकमध्ये आपल्या बहिणीकडे रेल्वेने आली होती. मात्र, मध्यरात्र झाल्याने ती पीडिता रेल्वे स्थानकावर एकटी थांबली होती. यावेळी दोघांनी तिची दिशाभूल करत चेहेडी शिव परिसरात नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. नाशिक पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेल्वे स्थानकावर थांबणे पडले महागात - नाशिक रोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 वर्षाची पीडित विवाहित नवसारी येथून मुंबई मार्गे नाशिकला आपल्या बहिणीकडे रेल्वेने आली होती. मध्यरात्री अडीचच्या सुमारास ती नाशिकरोड रेल्वे स्थानकावर उतरली. त्यानंतर तिने सह प्रवाशाच्या मोबाईलवरून बहिणीला फोन केला. मात्र, खूप रात्र झाली असल्याने तू आता येण्याची घाई करू नकोस, रेल्वे स्थानकावरच थांबून राहा, सकाळी तुला मी घेण्यास येते, असे बहिणीने तिला सांगितले. त्यामुळे तिने कुठलाही धोका न पत्करता रेल्वे स्थानकावरच थांबण्याचा निर्णय घेतला.

संशयित आरोपींना अटक - यादरम्यान रेल्वे स्थानकावरील पाणी विक्रेता कुणाल पवार यांनी मदतीचा बहाना करत तिची विचारपूस केली व तिला जेवणासाठी खाद्यपदार्थ दिले. काही वेळात त्याने आपला रिक्षा चालक मित्र प्रकाश मुंडे यालाही बोलून घेतले. या दोघांनी तिची दिशाभूल करून तिला फसवत चेहेडी शिवार परिसरातील एका पेरूच्या बागेत नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर पीडितेला मारहाण करून कोणाला काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी पीडितेने प्रतिकार करत तिथून पळ काढत आरडाओरडा केला. यावेळी शेजारील एका इमारतीमधील सुरक्षा रक्षकाच्या मदतीने तिने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. नाशिकरोड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पीडितेकडून आरोपींची माहिती घेत गुन्हा दाखल केला. संशयित आरोपींच्या वर्णनावरून पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवत दोघांना गुरुवारी सायंकाळी अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

रेल्वे स्थानक गुन्हेगारीचा अड्डा - नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसर गुन्हेगारीचा अड्डा बनला आहे. या ठिकाणी मारामाऱ्या, प्रवाशांना लूटने असे अनेक प्रकार वारंवार घडत असतात. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नाशिक हे धार्मिक, अध्यात्मिक स्थळ असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक रेल्वेने नाशिकला येत असतात. पोलिसांनी येथे गस्त वाढवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

हेही वाचा -

  1. Ahmednagar Crime News: धक्कादायक! पाथर्डी येथील एकाच विहिरीत आढळले चार मृतदेह; मृतांमध्ये आईसह तीन मुलांचा समावेश
  2. Police Bribery Case: बीड जिल्ह्यात दोन दिवसात दोन पोलीस कर्मचारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
  3. Attack On Businessman Office: दोन कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या कार्यालयावर सशस्त्र हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद

ABOUT THE AUTHOR

...view details