नाशिक - एका मांत्रिकाने पैशाचा पाऊस पाडण्याचे अमिष दाखवत प्रसादातून गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर ६ महिन्यांनी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस भोंदूबाबासह दोघा अज्ञात संशयितांचा शोध घेत आहेत.
पैशाचा पाऊस पाडण्याचे अमिष दाखवत भोंदूचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गुन्हा दाखल - minor girl
एका मांत्रिकाने पैशाचा पाऊस पाडण्याचे अमिष दाखवत प्रसादातून गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर ६ महिन्यांनी हा प्रकार उघडकीस आला.

पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित भोंदूबाबा आणि त्याचे मांत्रिक मित्र यांनी 'तुमच्या घरात नेहमी कोणीतरी आजारी असते, यावर मांत्रिक उपचार आहेत. भोंदूबाबाने दैवीशक्तीच्या आधारे तुमच्या घरात पैशांचा पाऊस पाडू', असे सांगितले. यावर पीडितेच्या कुटुंबांने विश्वास ठेवला. त्यानंतर भोंदूबाबाने दर अमावस्या-पौर्णिमेला घरी येऊन पूजा करण्याचा बहाणा करत कुटुंबातील सर्वांना प्रसादातून गुंगीचे औषध दिले. गुंगीमुळे आई-वडील झोपेत असताना पीडित मुलीवर गुंगीतच भोंदूबाबाने लैंगिक अत्याचार केला.
पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर ६ महिन्यांनी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब हादरून गेले असून त्यांनी याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस भोंदूबाबासह दोघा अज्ञात संशयितांचा शोध घेत आहेत.