नाशिक- अमेरिका आणि इराणमध्ये झालेल्या युद्धाचा परिणाम आता जागतिक बाजारपेठेवर होताना दिसून येत आहे. सोन्या पाठोपाठ आता पेट्रोलच्या दरातही मागील दहा दिवसांपासून काही प्रमाणात वाढ झाली आहे. नाशिकमध्ये मागील दहा दिवसात 80 पैशांनी वाढ झाली असून, भविष्यात जर अमेरिका इराण यांच्यात युद्ध सुरू राहिले तर पेट्रोलचे भाव मोठ्या प्रमाणत वाढतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.
नाशिकमध्ये सोन्यापाठोपाठ, पेट्रोलच्या दरातही वाढ
नाशिकमध्ये सोन्याचा भाव प्रतितोळा 41 हजारांवर पोहचला असून आता पेट्रोलच्या किमतीत देखील हळूहळू वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे हे दर वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.
नाशिकमध्ये सोन्याचे भाव प्रतितोळा 41 हजारांवर पोहचला असून, आता पेट्रोलच्या किंमतीत देखील हळूहळू वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. मागील दहा दिवसांत पेट्रोल दराममध्ये लिटर मागे 80 पैशांनी वाढ झाली असून सध्या नाशिकमध्ये पेट्रोलचे दर 81 रूपये 85 पैसे इतका झाला आहे. अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध होत असल्याने ह्याचा फटका इंधनावर होत आहे. जर पुढे युद्ध वाढत गेला तर काही दिवसात पेट्रोलच्या दारात 5 ते 6 रुपयांनी वाढ होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
हेही वाचा - शाळा महाविद्यालयात मुलींना स्वरक्षणाचे धडे देणे बंधनकारक करावे, नाशकातील महिलांच्या प्रतिक्रिया