नाशिक- गेल्या सहा महिन्यांपासून विधान परिषदेत १२ आमदारांच्या नियुक्त्या लांबविल्यावरून महाविकास आघाडी व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात शीतयुद्ध सुरू असून आता नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते रतन लथ यांनी उच्च न्यायालयात राज्यपालांविरोधात जनहित याचिका दाखल केली आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून रखडल्या आमदारांच्या नियुक्त्या
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडी स्थापन करत सत्तेवर आले. तेव्हापासून राज्यपालांविरुद्ध आघाडी सरकार असा संघर्ष पाहायला मिळत आहे. अशात महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली. परंतु राज्यपालांनी अद्यापही त्या नावांवर शिक्कामोर्तब केलेले नाही. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून आमदारांच्या नियुक्त्या रखडल्याने घटनात्मक पदाचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप करत फ्रावशी एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापकीय संचालक व सामाजिक कार्यकर्ते रतन लथ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. बिहारमध्ये निवडणुका पार पडल्यानंतर ४८ तासांमध्ये विधान परिषदेवर नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या होत्या परंतु महाराष्ट्रात मात्र राज्यपालांनी सहा महिने उलटूनही नियुक्त्या जाहीर केल्या नाहीत असे त्यांनी म्हटले आहे.
'राज्यपालांचे घटनेला धरून काम नाही'