महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट : निर्जंतुकीकरणासाठी संपूर्ण नाशकात औषध फवारणी, भारतातील पहिला प्रयोग नाशकात

संपूर्ण जगात कोरोना संसर्गाने हाहाकार केला असून भारतातदेखील कोरोना विषाणुच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रातही या आजाराच्या रुग्णांनी पन्नाशी गाठली आहे. मात्र, नाशिकमध्ये सुदैवाने एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आला नसला तरी राज्य शासन आणि महानगरपालिका खबरदारीच्या उपाय योजना करत आहे.

निर्जंतुकीकरणासाठी संपूर्ण नाशकात औषध फवारणी
निर्जंतुकीकरणासाठी संपूर्ण नाशकात औषध फवारणी

By

Published : Mar 20, 2020, 3:48 PM IST

नाशिक - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी नाशिक महानगरपालिकेने शहरातील निर्जंतुकीकरणासाठी संपूर्ण शहरात औषध फवारणी सुरू केली आहे. भारतातील शहरभर औषध फवारणीचा हा पहिलाच प्रयोग असून यामुळे महानगरपालिका घेत असलेल्या दक्षतेचे नाशिककर स्वागत करत आहे.

कोरोना विषाणूपासून निर्जंतुकीकरणासाठी संपूर्ण नाशकात औषध फवारणी

संपूर्ण जगात कोरोना संसर्गाने हाहाकार केला असून भारतातदेखील कोरोना विषाणुच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रातही या आजाराच्या रुग्णांनी पन्नाशी गाठली आहे. मात्र, नाशिकमध्ये सुदैवाने एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आला नसला तरी राज्य शासन आणि महानगरपालिका खबरदारीच्या उपाय योजना करत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेने शहरभर निर्जंतुकीकरणासाठी संपूर्ण शहरात औषध फवारणी सुरू केली आहे. यासाठी शेतकऱ्यांनीदेखील सामाजिक बंधिलकीतून महानगरपालिकेला औषध फवारणीचे ट्रॅक्टर मोफत उपलब्ध करून दिले आहे. या ट्रॅक्टरमध्ये पाण्यासोबत सोडियम हायपोक्लोराइड हे औषध टाकले जात आहे. याद्वारे रस्त्यावर असलेल्या घातक सूक्ष्म विषाणूंचा प्रादुर्भाव होणार नाही, असं महानगरपालिकेचं म्हणणं आहे.

हेही वाचा -कोरोना: स्वस्त धान्य दुकानांमधून एप्रिलसोबतच मे आणि जून महिन्याचेही धान्य देणार - भुजबळ

ही औषध फवारणी शहरातील ६ विभागात टप्याटप्याने केली जाणार असून पुढील ३१ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. गरज पडल्यास याचा कालावधी वाढवण्यात येणार असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच मुंबई पाठोपाठ शहरातही रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर १ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. कोरोनाबाबत प्रशासन काळजी घेत असले तरी नागरीकांनी सुद्धा प्रशासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करणे तितकेच गरजेचं आहे.

हेही वाचा -video: शाळांना सुट्टी मग आता करायचे काय..?

ABOUT THE AUTHOR

...view details