नाशिक -आतापर्यंत आपण नाणी, वाहन, पोस्ट तिकीट, पोस्ट कार्ड, कंदील, पुस्तक यांचा छंद असलेल्या व्यक्ती बद्दल ऐकल असेल. मात्र, नाशिकच्या गोविंद नगर भागात राहणारे किशोर तिडके ( Kishor Tidke ) यांना दारूच्या रिकाम्या बाटल्या गोळा करण्याचा छंद आहे. तिडके हे मागील 35 वर्षापासून हा छंद जोपासत असून त्यांच्याकडे अनेक देशांच्या वेगवेगळ्या आकाराच्या, रंगाच्या दीडशे वर्षांपासून ते आतापर्यंत तब्बल 7 हजार ( 7 Thousand Wine Bottles Collection ) दारू बॉटलांचा संग्रह आहे.
वेगवेगळ्या प्राण्यांच्या आकराच्या बॉटल -
किशोर तिडके एका खासगी कंपनीमध्ये काम करतात. 35 वर्षापूर्वी त्यांना वेगवेगळ्या देशांमधील मद्य बॉटल संग्रहित करण्याचा छंद लागला. आता त्यांच्या संग्रहात हत्ती, गरुड, कोंबडा, बदक, घोडा आणि विविध रंगातील आकर्षक अशा बाटल्या पाहायला मिळतात. या संग्रहातील सिगरेट पाइपच्या मद्य बॉटल बद्दल त्यांना आधिक आकर्षण असल्याचे किशोर तिडके सांगतात.
'छंदोमयी' ग्रुप -
नाशिकमध्ये वेगवेगळे छंद जोपासणाऱ्यांचा छंदोमयी मित्र ग्रुप आहे. यातील अनेकांनी अनेक छंद जोपाल्याचे बघालया मिळतात. यात कापूस शिल्पकार अनंत खैरणार यांचे कापूस शिल्प, विविध देशातील माती खनिजे दगड शंख शिंपले तसेच नाणी नोटा, त्याचबरोबर राजू मुळे हे विविध देशातील चित्रकारांची ओरिजनल पेंटिंग्स प्राचीन वस्तू संग्रहित करतात. अनंत धामणे यांच्याकडे त्यांच्या कमल वाडा संग्रहालयात पुरातन वस्तू जसे अडकित्ते पानाचे डबे कुलुपे, अशी प्राचीन वस्तू पाहायला मिळतात. तसेच प्रसाद देशपांडे ज्यांनी अनेक मान्यवरांच्या स्वाक्षरी त्यांच्या जीवन चरित्रसह संग्रहित करीत आहेत. यात एक वेगळा छंद असणारे ग्रंथ तुमच्या दारी प्रणेते विनायक रानडे यांना विविध ठिकाणचे लोकसंग्रह करण्याचा संग्रह हा एक वेगळाच म्हणता येईल. 'छंदोमयी' या ग्रुपच्या माध्यमातून मुलांना छंदाची आवड निर्माण व्हावी, त्यांना मोबाईल आणि व्हिडीओ गेम्सपासून दूर करत छंदा सारख्या सकारात्मक आनंद देणाऱ्या संग्रहासाठी प्रोत्साहन देत असते. या ग्रुपमध्ये महाराष्ट्र आणि भारतातील वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे छंद असणारे छंदिष्ट मित्र जोडले गेले आहेत. या माध्यमातून समाजात आनंद आणि तणाव मुक्त जीवन देण्याचा प्रयत्न केला जातो. अशा विविध छंदाचा आनंद घ्यायचा असेल, तर फेसबुकवर छंदोमयी या पेजची निर्मिती करण्यात आली आहे.
हेही वाचा -समिर वानखेडेंचा कार्यकाळ संपूनही पदमुक्ततेची सूचना नाही; 2 वर्षांत केली 'ही' कामगिरी