महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक : भोंदू बाबाने घातला अनेकांना गंडा, घटनास्थळावरून बनावट नोटा जप्त - नाशिक जिल्हा न्यूज अपडेट

पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून, लोकांना लूटणाऱ्या एका भोंदूबाबाचा अंबड पोलिसांनी भांडाफोड केला आहे. मात्र घटनास्थळी छापा पडताच हा भोंदू बाबा फरार झाला. पोलिसांनी घटनास्थळावरून पुजेसाठी लागणारे साहित्य आणि दोन हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.

घटनास्थळावरून पुजेचे साहित्य, बनावट नोटा जप्त
घटनास्थळावरून पुजेचे साहित्य, बनावट नोटा जप्त

By

Published : Jun 23, 2021, 5:34 PM IST

नाशिक - पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून, लोकांना लूटणाऱ्या एका भोंदूबाबाचा अंबड पोलिसांनी भांडाफोड केला आहे. मात्र घटनास्थळी छापा पडताच हा भोंदू बाबा फरार झाला. पोलिसांनी घटनास्थळावरून पुजेसाठी लागणारे साहित्य आणि दोन हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.

भोंदू बाबाने घातला अनेकांना गंडा, घटनास्थळावरून बनावट नोटा जप्त

घटनास्थळावरून दोन हजारांच्या बनावट नोटा जप्त

काही महिन्यांपूर्वी नवीन नाशिकमध्ये अशाच एका भोंदू बाबाने लोकांना गंडा घातला होता. आता पुन्हा एकदा असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या सिडको परिसरात वास्तव्यास असलेल्या एका भोंदू बाबाने पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून, अनेकांना गंडा घातला आहे. सिडको परिसरातील पवन नगरमध्ये असलेल्या एका स्वच्छता गृहाच्या वरच्या मजल्यावर हा बाबा राहात होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. मात्र तोपर्यंत बाबा फरार झाला होता. घटनास्थळावरून पुजेचे साहित्य आणि 2 हजारांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. फरार भोंदू बाबाचा शोध सुरू असून, त्याने आतापर्यंत किती जणांची फसवणूक केली याचा देखील तपास सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बेडवाल यांनी दिली.

हेही वाचा -शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेची मुलासह 12व्या मजल्यावरून उडी; काही दिवसांपूर्वीच पतीचे कोरोनाने निधन

ABOUT THE AUTHOR

...view details