नाशिक - आषाढी एकादशी निमित्त शहरातील विठ्ठल मंदिरात विठ्ठल भक्तांची मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. प्रत्येकालाच पंढरपूरला जाऊन विठुरायाच्या चरणी नतमस्तक होता येत नाही. त्यामुळे वारकऱ्यांसह विठ्ठल भक्त शहरातील मंदिरात विठुमाऊलीच्या नामाच्या गजरात तल्लीन झाले.
विठुरायाच्या दर्शनासाठी नाशिककरांची विठ्ठल मंदिरात गर्दी - Vitthal Mandir
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला न जाऊ शकलेले भाविकांनी शहरातील विठ्ठल मंदिरात दर्शन घेतले. यामध्ये लहान मुलांसह, युवक, महिलांचा समावेश होता.
विठ्ठल मंदिर नाशिक
कॉलेज रोडवरील श्री नामदेव विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांनी सकाळ पासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. हे तीस वर्ष जूने मंदिर असून या ठिकाणी दरवर्षी 20 ते 25 हजार भाविक विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात.
लहान मुलांनी वारकऱ्यांची वेशभूषा करत मंदिरातील सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तसेच नाशिक मधील इतरही विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून दिसून आले.