नाशिक- आषाढी एकादशी निमित्ताने आज नाशिकमध्येसुद्धा पंढरपुरासारखे भक्तीमय दृष्य पाहावयास मिळाले. विठुरायाचे दर्शन घेत अनेक भाविकांनी पंढरपूरातील पवित्र चंद्रभागेत स्नान करण्याचा योगायोग रामकुंडावरील गोदावरी नदीत स्नान करून अनुभवला.
नाशिकमध्ये रामकुंडावर पंढरपुरासारखे भक्तीमय दृष्य; भाविकांनी गोदावरी नदीत केले स्नान
विठुरायाचे दर्शन घेत अनेक भाविकांनी पंढरपूरातील पवित्र चंद्रभागेत स्नान करण्याचा योगायोग रामकुंडावरील गोदावरी नदीत स्नान करून अनुभवला.
पंढरपूरला जाऊ न शकणार्या अनेक भाविकांनी आज पहाटेपासूनच रामकुंडावर स्नान करत दीप सोडुन संकल्पपूर्ती केली. हजारोंच्या संख्येने भाविकांची मांदियाळी गंगाघाटावर जमली होती. या महिन्यात समाधानकारक पाऊस पडल्याने गोदावरी नदी खळखळून वाहत होती. भाविकांनी चातुर्मास आणि आषाढी एकादशीचा योग साधत या नदीतील रामकुंडावर स्नानाचा आनंद लुटला. रामकुंड परिसरात तसेच काळाराम मंदिराच्या दक्षिणेकडे विठ्ठल रुक्माईचे मंदिर आहे. गंगा घाटावर स्नान करून भाविकांनी या मंदीरात एकच गर्दी केली होती.