महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

cVIGIL अॅप निवडणूक अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी; तक्रारींऐवजी हाय-हॅलोचे मेसेज - सेल्फी

cVIGIL अॅपवर आचारसंहिता भंगाच्या तक्रारीऐवजी नागरिकांकडून सेल्फी आणि हाय- हँलोचे मेसेज टाकले जात आहेत.

cVIGIL अॅप ठरतेय अधिकाऱ्यांना ठरतेय डोकेदुखी

By

Published : Mar 21, 2019, 6:09 PM IST

नाशिक- आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून सी-व्हिजील अॅप तयार करण्यात आले. या अॅपवर एकीकडे सध्याच्या निवडणुकीच्या काळात तक्रारीचा पाऊस पडत आहे. मात्र, दुसरीकडे हे अॅप निवडणूक अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. कारण या अॅपवर आचारसंहिता भंगाच्या तक्रारीऐवजी नागरिक हाय, हॅलो आणि गुडमॉर्निंगसोबत सेल्फीचे मेसेजेस टाकत आहेत.

नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी ऑनलाईन दाखल करता याव्यात यासाठी निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेले सी-व्हिजील (cvigil) मोबाईल अॅप प्रभावी ठरले आहे. या अॅपवर राज्यभरात ७१७ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी २९४ तक्रारींमध्ये तथ्य आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. मात्र, हे अॅप निवडणूक अधिकाऱ्यांसाठी चांगलेच डोकेदुखी ठरत आहे. आचारसंहिता भंगाच्या तक्रारीऐवजी नागरिकांकडून सेल्फी आणि हाय- हॅलोचे मेसेज करण्यात येत आहेत. त्यामुळे अशा लोकांवर प्रशासन कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.

cVIGIL अॅप ठरतेय अधिकाऱ्यांना ठरतेय डोकेदुखी

आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास सी व्हिजील अॅपच्या माध्यमातून थेट ऑनलाइन तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कॅमेरा, इंटरनेट कनेक्शन आणि जीपीएस सुविधा असलेल्या स्मार्टफोनद्वारे या अॅपच्या माध्यमातून तक्रार करण्यात येते. आदर्श आचारसंहिता भंग होत असल्याचे वाटल्यास नागरिकांनी त्या घटनेचे छायाचित्र किंवा २-३ मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड करून अॅपवर टाकू शकतात. वापरकर्त्यास आपली ओळख लपवून तक्रार नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. या प्रणालीला नागरिक चांगला प्रतिसाद देत आहेत. सी-व्हिजील मोबाईल अॅप हे डाऊनलोडसाठी गुगल प्ले स्टोअर तसेच अॅपल स्टोअरवर उपलब्ध असल्याचे नाशिक निवडणूक अधिकारी अरुण अनंदकर यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details