नाशिक- सातपूर परिसरात पोलीस जनजागृतीसाठी दाखल होताच नागरिकांनी पुष्पवृष्टी केली. जिल्ह्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यामध्ये 2कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होते. मात्र, आता या रुग्णांची संख्या थेट 12वर जाऊन पोहोचल्याने प्रशासनासह नागरिकांची झोप उडाली आहे.
पोलीस संचलनादरम्यान सातपूरवासीयांनी पोलिसांवर केली फुलांची उधळण - नाशिक लॉकडाऊन
नाशिकच्या सातपूर परिसरात पोलिसांच्या वतीने जेव्हा संचलन करण्यात आले त्यावेळी सातपूरवासीयांनी पोलिसांच्या मार्गात रांगोळी रेखाटून तसेच त्यांच्या अंगावर पुष्पवृष्टी करून त्यांचे आभार मानले आहेत.
यात सगळ्यामध्ये नागरिकांना घराबाहेर न पडू देण्याचे मोठे आवाहन पोलीस प्रशासनासमोर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस प्रशासन डोळ्यात तेल घालून संपूर्ण जिल्ह्यात काम करत आहे. मात्र, आता नाशकात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणून पोलिसांनी शहरातील प्रत्येक कॉलोनीमध्ये आपला ताफा घेऊन जात नागरिकांना परिस्थितीचे गांभीर्य समजून घेण्याचे आवाहन केले आहे. नाशिकच्या सातपूर परिसरात पोलिसांच्या वतीने जेव्हा संचलन करण्यात आले त्यावेळी सातपूरवासीयांनी पोलिसांच्या मार्गात रांगोळी रेखाटून तसेच त्यांच्या अंगावर पुष्पवृष्टी करून त्यांचे आभार मानले आहेत. तसेच टाळ्या वाजवून त्यांच्या प्रति असलेला आदर, प्रेम आणि आपुलकी दाखविली.