महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वनी-सापुतारा रस्त्याच्या कामामुळे नागरिक त्रस्त, सर्दी खोकल्याच्या रुग्णांत वाढ - heavy dust

वनी-सापुतारा या राज्यमार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या २ वर्षांपासून सुरू आहे. या कामासाठी ठिकठिकाणी रस्ता जेसीबीने खोदण्यात आला आहे. यामुळे कामादरम्यान मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे पांडाणे गावातील रस्त्याच्या कामादरम्यान ग्रामस्थांना विविध श्वसनाच्या समस्यांना सामोरे जावे लागत असून ग्रामस्थांनी या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

वनी-सापुतारा रस्त्याच्या कामामुळे नागरिक त्रस्त
वनी-सापुतारा रस्त्याच्या कामामुळे नागरिक त्रस्त

By

Published : Feb 2, 2020, 1:47 PM IST

नाशिक - दिंडोरी तालुक्यातील वनी-सापुतारा रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या दरम्यान पुणेगाव फाटा ते देवनदीपर्यंत सुरू असलेल्या कामादरम्यान उडणाऱ्या धुळीमुळे पांडाणे गावात सर्दी खोकल्याच्या रुग्णांत वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी हा रस्ता त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

वनी-सापुतारा रस्त्याच्या कामामुळे नागरिक त्रस्त

नाशिककडून सापुतारा मार्गे सूरतला जाणाऱ्या वाहनांचा मार्ग पांडाणे, बोरगावमार्गे असून या राज्य महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम गेल्या २ वर्षांपासून सुरू आहे. तर, गेल्या महिन्यापासून पांडाणे गावाजवळील रस्ता या कामांतर्गत जेसीबीच्या साहाय्याने उखडून टाकल्यामुळे या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या धुळीमुळे ग्रामस्थांना सर्दी, खोकला, श्वसनाच्या आजारांसह इतर समस्या उद्भवू लागल्या असून ग्रामस्थांनी या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा -नाशिक : काकानेच केला पुतण्यावर गोळीबार

पांडाणे गावाच्या रस्त्यालगत प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने येथे भरती असलेल्या रुग्णांना, नवजात बाळांना धुळीमुळे श्वसनाचा त्रास होत आहे. तर, वाहनाच्या चाकातून उडणारी धूळ, खड्यांमुळे जवळपासच्या घरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या प्रकाराने त्रासलेल्या ग्रामस्थांनी यापासून बचावासाठीचा उपाय म्हणून घरे शेडनेट, ग्रीननेट लावून झाकून टाकली आहेत. या रस्त्यावर पाणी मारून धूळ आटोक्यात आणण्याच्या मागणीसह या रस्त्याचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

हेही वाचा - अर्थसंकल्प: 'शिक्षण धोरणात पैशाची तरतूद फारच कमी; शाळाबाह्य मुलांचा विचार नाही'

ABOUT THE AUTHOR

...view details