नाशिक- सावरकरांची जन्मभूमी असलेल्या नाशिकमधील भगूर येथे सावरकर प्रेमींनी राहुल गांधी यांचा निषेध केला. 'स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जय असो, राहुल गांधीचा निषेध असो' अशा घोषणा देत संतप्त सावरकर प्रेमींनी राहुल गांधी विरोधात रोष व्यक्त केला.
भगूरमध्ये सावरकर प्रेमींनी केला राहुल गांधींचा निषेध - Veer Sawarkars birthplace Bhagoor
सावरकरांची जन्मभूमी असलेल्या नाशिकमधील भगूर येथे सावरकर प्रेमींनी राहुल गांधी यांचा निषेध केला. 'स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जय असो, राहुल गांधीचा निषेध असो' अशा घोषणा देत संतप्त सावरकर प्रेमींनी राहुल गांधी विरोधात रोष व्यक्त केला.
राहुल गांधी यांनी 'रेप इन इंडीया' वक्तव्य केल्यानंतर गदारोळ सुरू होता. त्यावर माफीची मागणी होत असतानाच, मी राहुल सावरकर नाही, तर मी राहुल गांधी आहे. मरन पत्करेन पण माफी मागणार नाही, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानामुळे सावरकर प्रेमींच्या भावना या दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे जन्मभूमी असलेल्या भगूर येथे सर्व सावरकर प्रेमींनी एकत्र येत राहुल गांधींचा निषेध केला. सावरकरांचे योगदान हे देशासाठी मोठे आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल असे शब्द वापरणे योग्य नाही, अशा प्रतिक्रिया यावेळी सावरकर प्रेमींनी दिल्या.