नांदगांव (नाशिक) - नांदगांव तालुक्यातील आमोद्यात दहा मोरांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असुन या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्याकडून पाहणी करुन घटनेचा पंचनामा करण्यात आला. मृत्यूचे कारण अस्पष्ट असले तरी वविच्छेदन केल्यानंतरच कारण स्पष्ट होणार असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. नांदगांव वनपरिक्षेत्र हे फार मोठे असुन येथे मोरांची व काळवीट शिकार करण्यात येत असल्याचे आरोप देखील करण्यात येत आहे. या आरोपींना वनविभाग पाठीशी घालत असल्याची चर्चा परिसरात आहे.
नांदगांवला 10 मोरांचा मृत्यू! विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज - नाशिक नांदगांवला 10 मोरांचा मृत्यू
नांदगांव वनपरिक्षेत्र अतिशय मोठे आहे याला लागून जळगांव धुळे औरंगाबाद अहमदनगर या जिल्ह्याच्या सीमा आहेत.अनेकदा येथे हरीण काळवीट यासह मोरांच्या शिकारी करण्याच्या घटना घडल्या आहेत.याकडे वनपरिक्षेत्र विभागाचे अर्थपूर्ण लक्ष असल्याचा आरोप देखील अनेकदा करण्यात आला आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून करण्यात येत आहे.
मोरांचा मृत्यू हा विषबाधाने -नांदगांव तालुक्यातील आमोदे येथील सतारी शिवार परिसरात दहा मोरांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली, ही माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना समजल्यानतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पंचनामा केला व सर्व मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले आहे. मोर मरण्याची कारण स्पष्ट नसली तरी शवविच्छेदन केल्यानंतरच मोरांचा मृत्यू झाल्याचे कळू शकेलं. या मोरांचा मृत्यू हा विषबाधाने झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे याबाबत पुढील तपास नांदगांव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कासार हे करत आहेत, मृत्य झालेल्या मध्ये चार लांडोर व सहा मादी यांचा समावेश आहे , मृत्य झालेल्या मोरांचा शवविच्छेदन करण्यासाठी नांदगांव येथील पशु वैद्यकीय रुग्णलायत पाठवण्यात आले आहेत.
वनविभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष - नांदगांव वनपरिक्षेत्र अतिशय मोठे आहे याला लागून जळगांव धुळे औरंगाबाद अहमदनगर या जिल्ह्याच्या सीमा आहेत.अनेकदा येथे हरीण काळवीट यासह मोरांच्या शिकारी करण्याच्या घटना घडल्या आहेत.याकडे वनपरिक्षेत्र विभागाचे अर्थपूर्ण लक्ष असल्याचा आरोप देखील अनेकदा करण्यात आला आहे.याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून करण्यात येत आहे.