महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

pandharpur wari 2021 : संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान, वारकर्‍यांचा उत्साह तूसभरही कमी नाही - नाशिक पालखी न्यूज

गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही सलग दुसऱ्या वर्षी पंढरपूरच्या वारीवर कोरोना संकट आहे. गुरुवारी संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांचा पालखी प्रस्थान सोहळा त्र्यंबकेश्वरमध्ये पार पडला. कोरोनामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. दरम्यान, यंदा दोन बसमधून नाथ महाराजांची पालखी पंढरीला जाणार आहे.

NASHIK
NASHIK

By

Published : Jun 24, 2021, 3:51 PM IST

नाशिक - संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडला. पौर्णिमेच्या मुहूर्तावर गुरुवारी (24 जून) त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे नाथ महाराजांच्या पालखीने प्रातिनिधिक स्वरुपात प्रस्थान केले. कोरोना संकटामुळे वारी यंदाही होणार नसली तरी या सोहळ्यासाठी वारकर्‍यांमध्ये तूसभरही उत्साह कमी झाला नाही.

संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

दोन बसमधून पालखी जाणार पंढरीला

दरवर्षी आजच्याच दिवशी निवृत्तीनाथांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करते. त्र्यंबकेश्वर, सिन्नर, नगर मार्गे पंढरपूरकडे ती मार्गक्रमण करते. मात्र, कोरोना संकटामुळे त्र्यंबकेश्वरच्या निवृत्तीनाथ महाराज पालखीचा प्रातिनिधिक प्रस्थान सोहळा आज निवृत्तीनाथ मंदिरातच पार पडला. निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीची नित्य पूजा केली जाणार आहे. पालखी दोन बस मधून ठराविक वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंढरपूरला जाणार आहे. याची माहिती माजी अध्यक्ष हभप संजय महाराज धोंगडे यांनी दिली आहे.

19 जुलैला पालखी पंढरीकडे जाणार

नाथ महाराजांच्या पालखीचे आज प्रस्थान झाले. 19 जुलैपर्यंत ही पालखी येथेच असणार आहे. 19 जुलैला पालखी शासनाच्या नियमानुसार दोन बसमधून पंढरपूरला जाणार आहे. यावेळी पालखीसोबत ठराविकच वारकरी असणार आहेत.

वारकऱ्यांनी गर्दी न करण्याचे आवाहन

वारकरी संप्रदायमध्ये अतिशय मानाची पालखी म्हणून या पालखीची ओळख आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वारकऱ्यांनीही दर्शनासाठी गर्दी करू नये, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे. दरम्यान, कोरोना संकट असले तरी वारकऱ्यांमधील आनंद तूसभरही कमी झालेला नाही.

हेही वाचा -पुण्यात आत्मदहनाचा प्रयत्न, अतिक्रमण हटाव पथक आणि नागरिकांमध्ये जोरदार झटापट

ABOUT THE AUTHOR

...view details