नाशिक - शहरातील पारंपरिक पिंपळपारावर पाडवा पहाट निमित्त सुरेल मैफिलीच आयोजन करण्यात आले होते. संस्कृती वैभव मंडळातर्फे आयोजित या कार्यक्रमात ग्वाल्हेर घराण्याचे सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक ओंकार दादरकर यांच्या शास्त्रीय गायनाचा आस्वाद नाशिककर रसिकांनी घेतला.
नाशिकच्या पारंपरिक पिंपळपारावर 'पाडवा पहाट' निमित्त रंगली सुरेल मैफिल - Classical singer Onkar Dadarkar in nashik
शहरातील पारंपरिक पिंपळपारावर पाडवा पहाट निमित्त सुरेल मैफिलीच आयोजन करण्यात आले होते. संस्कृती वैभव मंडळातर्फे आयोजित या कार्यक्रमात ग्वाल्हेर घराण्याचे सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक ओंकार दादरकर यांच्या शास्त्रीय गायनाचा आस्वाद नाशिककर रसिकांनी घेतला.

हेही वाचा -साहेब तुम्हीच सांगा जगायचं कसं? लोकप्रतिनिधी समोर शेतकरी ढसाढसा रडला!
मांगल्याचे लेणं घेऊन येणाऱ्या दीपोत्सवाचा आनंद पाडवा संगीत मैफिलीमुळे आणखीनच द्विगुणित झाला आहे. नाशिकमध्ये एक ना अनेक कार्यक्रमांची रेलचेल पाहावयास मिळाली. आज पाडवा पहाट निमित्त परंपरागत नाशिकच्या पिंपळ पारावर संस्कृती वैभव मंडळातर्फे शास्त्रीय संगीताची मैफिल रंगली. या कार्यक्रमात ग्वाल्हेर घराण्याचे सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक ओंकार दादरकर यांच्या शास्त्रीय गायनाचा आस्वाद नाशिककर रसिकांनी घेतला. ह्या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक शाहू महाराज खैरे यांनी केले होते.