महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रुग्णवाहिकेतून रुग्ण नाही तर ऑक्सिजन सिलिंडरची वाहतूक!

नाशिक शहरासोबत ग्रामीण भागातदेखील ऑक्सिजनची मागणी वाढली असल्याने ऑक्सिजन सिलिंडरची वाहतूक करण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर केला जात आहे. ऑक्सिजन सिलिंडर घेण्यासाठी ऑक्सिजन पुरवठादाराकडे रुग्णवाहिकांची रांग दिसत आहे.

Oxygen transport
ऑक्सिजन वाहतूक

By

Published : Sep 24, 2020, 4:44 PM IST

नाशिक -जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असून सर्वच सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. कोरोना काळात ऑक्सिजन ही अत्यावश्यक सेवा झाली आहे. ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी खासगी रुग्णालयांकडून चक्क रुग्णवाहिकेचा वापर केला जात आहे.

रुग्णवाहिकेतून ऑक्सिजनची वाहतूक

नाशिक जिल्ह्यात रोज 1 हजार 500 ते २ हजार नवीन रुग्ण आढळत आहेत. ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासते अशांना सरकारी आणि खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले जात आहे. मात्र, कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढल्याने ऑक्सिजनची कमतरता भासू लागली आहे. ऑक्सिजनची मागणी वाढली असून लिक्विड ऑक्सिजनचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी लिक्विडचे भाव मोठ्या प्रमाणात वाढवले आहेत. परिणामी ऑक्सिजन सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत. नाशिक शहरासोबत ग्रामीण भागात देखील ऑक्सिजनची मागणी वाढली असल्याने ऑक्सिजन सिलिंडरची वाहतूक करण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर केला जात आहे. ऑक्सिजन सिलिंडर घेण्यासाठी ऑक्सिजन पुरवठादाराकडे रुग्णवाहिकांची रांग दिसत आहे. ऑक्सिजन सिलिंडर वाहतुकीसाठी रुग्णवाहिकांची मोडतोड केल्याचेही दिसून आले आहे. रुग्णवाहिकांची कमतरता असताना ऑक्सिजन वाहतुकीसाठी रुग्णवाहिकेचा अट्टाहास का केला जात आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नाशिक जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता पडू नये, यासाठी पालकमंत्र्यांच्या बैठकीत उद्योगासाठी वापरण्यात येणारे 80 टक्के ऑक्सिजन आरोग्यासाठी द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे काही प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत झाला आहे. मात्र, काही रुग्णालये इतर वाहनांचा पर्याय असताना ऑक्सिजन वाहतूक करण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर करताना दिसत आहेत. ऑक्सिजन रुग्णालयांमध्ये वेळेवर पोहचवण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर होत असल्याचे रुग्णवाहिका चालकांनी सांगितले. रुग्णवाहिका असल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी असली तरी अडचण येत नाही. नागरिक रुग्णवाहिका बघून प्रधान्य देत असल्याने आम्ही वेळेवर ऑक्सिजन सिलिंडर रुग्णालयांमध्ये नेऊ शकतो, असे कारण रुग्णवाहिका चालकानी दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details