नाशिक- विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला मतदान पार पडले. येथील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी पक्षाला रामराम करत भाजप, सेना पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे यंदाच्या नाशिकमध्ये विधानसभा निवडणुकीत युतीचे पारडे जड असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात एकूण 15 विधानसभा मतदारसंघ असून, 2014 मधील विधानसभा मतदारसंघ पक्षीय बलाबल बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस 4, काँग्रेस 2, भाजप 4, शिवसेना 4, माकप 1 अशी परिस्थिती आहे.
तर आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी युतीच्या उमेदवारांना पसंती दिल्याने नाशिकमधून शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी मतदारसंघातून भाजपच्या भारती पवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. यावर विधानसभेतही असेच चित्र दिसेल असे राजकीय जाणकारांचे म्हणणं आहे.
- येवला विधानसभा मतदारसंघ -
नाशिक जिल्ह्यात प्रमुख लढत येवला मतदारसंघात आहे. माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांचा हा बालेकिल्ला आहे. मागच्यावेळी त्यांनी शिवसेनच्या संभाजी पवार यांचा पराभव केला होता. यंदाही राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात पुन्हा एकदा शिवसेनचे संभाजी पवार उभे आहेत. तर छगन भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करतील, अशा चर्चा गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात होत होत्या. मात्र, भुजबळांनी पुणे येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित राहत, शिवसेनेत जाणार का? या प्रश्नाला पूर्णविराम दिला.
- 2014 मतदानाची आकडेवारी
- राष्ट्रवादी - छगन भुजबळ - 1,12,787
- कॉंग्रेस - निवृत्ती अहिरे - 875
- शिवसेना - संभाजी पवार 66,345
- इगतपुरी विधानसभा मतदारसंघ -
तर इगतपुरी मतदारसंघ हा आदिवासींसाठी राखीव आहे. यंदाच्या विधानसभेसाठी इथून एकूण 9 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. 4 अधिकृत पक्षांची लढत येथे पाहायला मिळत आहे. 2014 साली माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांच्या कन्या असलेल्या निर्मला गावित या कॉंग्रेस पक्षाकडून येथून विजयी झाल्या होत्या. शिवसेनेच्या शिवराम झोले यांनी कडवे आव्हान दिले होते. तर यंदा शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार या निर्मला गावित आहेत. तर काँग्रेसचे हिरामण खोसकर, मनसेने नाशिकचे नगरसेवक योगेश शेवरे व वंचित बहुजन आघाडीचे लकी (लक्ष्मण) जाधव हे विधानसभेची निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे या मतदारसंघातून कोण निवडूण येणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
- 2014 मतदानाची आकडेवारी
- कॉंग्रेस - निर्मला गावित ४९ हजार १२८ मते
- शिवसेना - शिवराम झोले ३८ हजार ७५१
- राष्ट्रवादी - हिरामण खोसकर २१ हजार ७४६
- अपक्ष - काशिनाथ मेंगाळ - १७ हजार १६७
- भाजप - चंद्रकांत खाडे - ११ हजार २५०
- बागलाण विधानसभा मतदारसंघ -
धुळे जिल्ह्यातील हा मतदारसंघ अनुसूचीत जमातीसाठी राखीव आहे. मागच्या निवडणुकीपासून या ठिकाणी भाजपने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मात्र, सुरुवातीपासूनच बोरसे आणि चव्हाण या दोन कुटुंबांमध्येही हा मतदारसंघ विभागला गेल्याचे दिसून येते. मागच्यावर्षी मोदी लाट असूनही राष्ट्रवादीच्या दीपिका चव्हाण येथून निवडून आल्या होत्या. यंदाही राष्ट्रवादीने दीपिका यांनाच उमेदवारी दिली आहे. तर त्यांच्या विरोधात भाजपचे दिलीप बोरसे रिंगणात आहेत.
- 2014 च्या विधानसभा निवडणुकीत झालेले मतदान
- दिपीका चव्हाण-राष्ट्रवादी - 68,434
- दिलीप बोरसे - भाजपा - 64,253
- साधना गवळी - शिवसेना - 9108
- जयश्री बर्डे - कॉंग्रेस - 6946
- मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ -
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव बाह्य हा मतदारसंघ धुळे जिल्ह्यात येतो. या मतदारसंघात 76 गावांचा समावेश आहे. 2004 सालापर्यंत इथे हीरे घराण्याचे वर्चस्व होते. मात्र, त्यावेळी दादाजी भुसे यांनी त्यांचा पराभव केला. 2009 साली भुसे यांनी भुजबळांच्या मदतीने पुन्हा एकदा इथे विजय मिळवला. हा पराभव जिव्हारी लागल्याने हिरे यांनी राजकीय संन्यास घेत नाशिकला मुक्काम हलवला. 2014 सालीही दादाजी भूसेच येथील विद्यमान आमदार झाले. यंदा पुन्हा एकदा शिवसेनेने दादाजी भुसे यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासमोर काँग्रेसच्या तुषार शेवाळे यांचे आव्हान आहे.
- 2014 च्या विधानसभा निवडणुकीत झालेले मतदान
- दादा भुसे - शिवसेना - 82,093 मतं
- पवन ठाकरे - भाजपा - 44,672 मतं
- सुनिल गायकवाड - राष्ट्रवादी - 34,117 मतं
- संदीप पाटील - मनसे - 8,561 मतं
- डॉ.राजेंद्र ठाकरे - काँग्रेस - 4,551 मतं
- मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ -
मुस्लिमबहुल हा मतदारसंघ धुळे जिल्ह्यात येतो. सध्या येथे काँग्रेसचे असिफ शेख विद्यमान आमदार आहेत. हा मतदारसंघ जनता दलाचे सर्वेसर्वा निहाल अहमद यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मात्र, 1999 साली विद्यमान महापौर रशीद शेख यांनी त्यांचा पराभव केला. यंदा पुन्हा एकदा काँग्रेसकडून असिफ शेख यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर भाजपकडून दिपाली वारुळे रिंगणात आहेत. 2014 ला काँग्रेसच्या असिफ शेख यांनी राष्ट्रवादीच्या मौलाना मुफ्तीचा पराभव केला होता.
- 2014 ला उमेदवारांना मिळालेली मतं
- आसिफ रशीद शेख - काँग्रेस - 71731
- मौलाना मुफ्ती - राष्ट्रवादी - 57189
- बुलंद इकबाल - जनता दल - 6487
- साजीद अख्तर - शिवसेना - 1319
- सिन्नर विधानसभा मतदारसंघ -
नाशिक जिल्ह्यातील एक महत्वाचा मतदारसंघ म्हणून सिन्नरकडे पहिले जाते. हा मतदारसंघ भाजप-शिवसेनचा बालेकिल्ला आहे. सध्या शिवसेनेचे राजाभाऊ वाजे येथील विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघात वंजारी समाजाची मते फार महत्वाची आहे. यंदा शिवसेना-भाजपा युतीचे विद्यमान आमदार राजाभाऊ वाजे, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासह नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.
- 2014 विधानसभा निकाल
- राजाभाऊ वाजे - शिवसेना - 1 लाख 4 हजार 31
- माणिकराव कोकाटे - भाजप - 83 हजार 477
- संपत काळे - काँग्रेस - 3 हजार 317
- शुभांगी गर्जे - राष्टवादी - 2 हजार 52
- कळवण विधानसभा मतदारसंघ -
हा मतदारसंघ अनुसूचीत जमातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघात माकपचे जेपी गावित हे विद्यमान आमदार आहेत. तर यंदा शिवसेनेच्या मोहन गांगुर्डे आणि राष्ट्रवादीच्या नितीन पवार यांच्यामध्ये प्रमुख लढत असणार आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये माकपच्या जे. पी. गावीत आणि राष्ट्रवादीच्या ए. टी. पवार यांच्यामध्ये लढत झाली. यामध्ये जे पी गावीत यांचा विजय झाला.
- कळवण विधानसभा मतदारसंघ निकाल 2014
- माकप - जिवा पांडु गावित - 67 हजार 795
- राष्ट्रवादी काँग्रेस - अर्जून पवार - 63 हजार 9
- भाजप - यशवंत गवळी - 25 हजार 457
- शिवसेना - भारत वाघमारे - 9 हजार 024
- चांदवड विधानसभा मतदारसंघ -