महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोकणातील अस्सल हापूस आंब्यांवर ताव मारण्यासाठी नाशिककरांची आंबा महोत्सवाला गर्दी - Nashik

कोकणासह इतर भागातील बदलत्या हवामानाचा फटका आंबा उत्पादनाला बसला आहे, तरी उत्पादन चांगले झाल्याने हापूस आंब्याचे दर गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही ८०० ते ९०० रुपयांच्या दरम्यान आहेत.  त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात नाशिककरांना अगदी रास्त  दरात कोकणातील अस्सल हापूसची चव चाखता येत आहे.

कोकणातील अस्सल हापूस आंब्यांवर ताव मारण्यासाठी नाशिककरांची आंबा महोत्सवाला गर्दी

By

Published : May 3, 2019, 9:45 PM IST

नाशिक -शेतकरी ते थेट ग्राहक या संकल्पनेतून कोकण पर्यटन विकास संस्थेतर्फे नाशिकमध्ये आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणातील अस्सल हापूस आंबा खरेदी करण्यासाठी नाशिककरांची मोठी गर्दी होतं आहे.

कोकणातील अस्सल हापूस आंब्यांवर ताव मारण्यासाठी नाशिककरांची आंबा महोत्सवाला गर्दी

कोकणासह इतर भागातील बदलत्या हवामानाचा फटका आंबा उत्पादनाला बसला आहे, तरी उत्पादन चांगले झाल्याने हापूस आंब्याचे दर गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही ८०० ते ९०० रुपयांच्या दरम्यान आहेत. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात नाशिककरांना अगदी रास्त दरात कोकणातील अस्सल हापूसची चव चाखता येत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच हापूस आंब्याचा शहरातील कोकण आंबा महोत्सवात गोडवा दरवळत आहे. कोकण पर्यटन विकास संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण आंबा महोत्सव कालिका माता मंदिराच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

रत्नागिरी आणि देवगड येथील आंबा व्यावसायिक या महोत्सवात सहभागी झाले आहेत. महोत्सवात लहान, मध्यम आणि मोठ्या आकाराचे आंबे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांची किंमत २५० ते ९०० रुपये डझन आणि आंब्याची पेटी ७०० रुपयापासून पुढे आहे. हवामानाचा परिणाम आंबा उत्पादनावर होऊन यंदा हापूसचे उत्पादन कमी झाले असले तरीही महिन्याच्या मध्यावर मोठ्या प्रमाणात आंबा बाजारात दाखल झाला आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मोठ्या आकाराचा आणि जास्त संख्येने हापूस बाजारात दाखल होईल असे उत्पादकांनी सांगितले आहे.

आंब्यासोबतच विक्रीसाठी ठेवण्यात आलेले कोकणातील पदार्थांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. ताक मिरची, गोड कोकम, सांगडी मिरची, मँगो जॅम, आमसूल, आवळा कॅन्डी, कोकम आगळ, तळलेले गरे, आंबा पोळी,मँगो जेली, कांदा लसूण चटणी, कोकम सरबत, आंबा सिरप या वस्तुंना ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details