महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 15, 2022, 9:20 AM IST

ETV Bharat / state

Tourist Places Lockdown: खुल्या जागेतील पर्यटन स्थळे बंद करा पालकमंत्र्यांचे आदेश

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव (Increasing corona patient ) पाहता जिल्ह्यातील खुल्या जागेवरील पर्यटन स्थळे बंद ( close open space tourist spots) करण्यात यावेत असे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांनी जिल्हाप्रशासनाला दिले आहेत. या निर्णयाची तत्काळ त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. दरम्यान, बंधिस्त जागेतील पर्यटन स्थळे अगोदरच बंद करण्यात आली आहेत

Nashik
नाशिक

नाशिक : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून रुग्णांचा आकडा दोन हजारांच्या आसपास पोहचला आहे. गर्दी टाळण्यासाठी दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदी लागू आहे. पण गर्दी अटोक्यात येत नसल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यातही पर्यटन स्थळांवर प्रचंड गर्दी पहायला मिळत आहे. गडकिल्ले, धरण परिसर, उद्याने, निसर्गरम्य स्थळे या ठिकाणी पर्यटक तुफान गर्दी हेत आहे. त्यामुळे कोरोना आणखी पसरण्याची भीती वाढत आहे. ते पाहता आता जिल्ह्यातील खुल्या जागेतील पर्यटनस्थळांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्ह्यात ४८३ मेट्रीक टन ऑक्सिजन साठा
कोरानामुळे मयत झालेल्या रूग्णांच्या कुटुंबीयांनी आतापर्यंत १२ हजार ४४७ ऑनलाईन अर्ज सादर केले असून त्यापैकी ५ हजार ३६६ अर्जांची छाननी करून ते अर्ज मंजूरीसाठी पाठविण्यात आले आहेत. व उर्वरीत अर्जांची छाननीची प्रक्रिया सुरू आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात ४८३ मेट्रीक टन ऑक्सिजन साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. जिल्ह्यातील वाढणारा पॉझेटिव्हीटीचा दर पाहता तपासणीचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे,तसेच मालेगावमधील कमी येणाऱ्या रूग्णसंख्येचा अभ्यास करण्याकरीता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मदतीने सुत्र या संस्थेकडुन सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यास मालेगावकरांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यानी सांगितले आहे

धार्मिक स्थळांसाठी नियमावली
धार्मिक स्थळांवर गर्दी अटोक्यात ठेवण्यासाठी महापालिका व पोलिस यंत्रणेणे नियोजन करावे, असे आदेश पालकमंत्री भुजबळ यांनी दिले. विशेषत: गोदाघाट, रामकुंड या ठिकाणी धार्मिकविधिसाठी रोज हजारो भाविक येतात. या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी नियमावली तयार करावी, असे आदेश भुजबळ यांनी दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details