कांदा व्यापाऱ्यांच्या संपाविषयी बोलताना व्यापारी वर्ग लासलगाव, येवला (नाशिक):कांदा व्यापाऱ्यांनी विविध मागण्यांकरिता कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवला आहे. या संदर्भात आज येवला, लासलगाव सह नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीचे दुसऱ्या दिवशी कांदा लिलाव बंद ठेवले. त्या संदर्भात लासलगाव, येवला बाजार समितीत बैठक झाली. मात्र कोणत्या तोडगा न निघाल्याने व्यापारी आपल्या बंदच्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसून आलं.
तर होणार ही कारवाई:व्यापाऱ्यांच्या काही मागण्यांसाठी बाजार समितीत कांदा लिलाव बंद करण्याचा निर्णय घेतला. मार्केट सुरू व्हावं याकरिता आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ व बाजार समिती अधिकारी यांची बैठक संपन्न झाली. बाजार समितीने व्यापारी वर्गाची भूमिका बघता ते बंदवर ते ठाम असल्याने जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशानुसार कारवाई होणार असून कांदा व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करून भूखंड जमा करण्याची कारवाई केली जाणार आहे. लासलगाव येथे 131 व्यापारी असून या सर्व व्यापाऱ्यांवर कारवाई होणार आहे. 25 ते 27 व्यापाऱ्यांनी परवाने बाजार समितीकडे सादर केले असून 36 व्यापाऱ्यांना दिलेले भूखंड देखील परत घेणार असल्याची माहिती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली.
येवल्यात देखील व्यापारी बंदवर ठाम:नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी आपल्या विविध मागण्याकरिता बंद पुकारला आहे. आज दुसऱ्या दिवशीही कांदा लिलाव बंद असल्याने आज येवला बाजार समिती संचालक मंडळ, अधिकारी तसेच कांदा व्यापाऱ्यांची बैठक झाली. मात्र या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने व्यापारी आपल्या बंदच्या निर्णयावर ठाम आहेत.
व्यापाऱ्यांची उद्या येवल्यात होणार बैठक:नाशिक कांदा व्यापारी असोसिएशनची येवल्यात उद्या कलंत्री लॉन्स येथे बैठक होणार आहे. आपल्या विविध मागण्या संदर्भात इथ चर्चा होणार असल्याने काय तोडगा निघतो हे नक्कीच बघणं महत्त्वाचे ठरणार आहे. यावेळी बैठकीला नाशिक जिल्ह्यातील सर्वच कांदा व्यापारी हे येवला येथे हजर राहणार असल्याची माहिती येवल्यातील कांदा व्यापारी यांनी दिले आहे.
हेही वाचा:
- Lasalgaon Onion Market लासलगावच्या कांद्यांने भारताची जगभरात ओळख निर्माण केली - सभापती सुवर्णा जगताप
- Lasalgaon Onion Market : 11 महिन्यात कांदा निर्यातीमधून देशाला 2 हजार 973 कोटींचे परकीय चलन प्राप्त
- Onion Exports Declined : कांद्याने आणले शेतकरी अन् व्यापाऱ्यांच्या डोळ्यात पाणी; श्रीलंकेतील परिस्थितीमुळे घटली निर्यात