महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवरातून कांदा चोरीला!

नांदगाव तालुक्यातील भवरी येथील प्रसाद गायकवाड या शेतकऱ्याने बाजार समितीत लिलावसाठी कांदा आणला होता. रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या ट्रॅक्टरमधून तब्बल 2 क्विंटल कांद्याची चोरी केली.

कांदा चोरी
कांदा चोरी

By

Published : Jan 10, 2020, 11:05 AM IST

नाशिक - कांद्याचे भाव वाढल्यामुळे कांदा चोरीच्या घटना होण्यास सुरुवात झाली आहे. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलावसाठी आणलेल्या कांद्यावर चोरट्यांनी डल्ला मारून 2 क्विंटल कांदा चोरून नेला. बाजार समितीच्या आवारातून कांदा चोरीला गेल्याने शेतकरी आणि व्यापारीवर्गात चिंतेचे वातावरण आहे.

बाजार समितीच्या आवरातून कांदा चोरी


नांदगाव तालुक्यातील भवरी येथील प्रसाद गायकवाड या शेतकऱ्याने बाजार समितीत लिलावसाठी कांदा आणला होता. रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या ट्रॅक्टरमधून तब्बल 2 क्विंटल कांद्याची चोरी केली. दुसऱ्या दिवशी सकाळी हा प्रकार गायकवाड यांच्या लक्षात आला. या प्रकरणी पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला, असून पुढील तपास सुरू केला आहे.

हेही वाचा - नाशिकमध्ये सोन्यापाठोपाठ, पेट्रोलच्या दरातही वाढ

सध्या कांद्याला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे तो कांदा बाजारात आणून विकण्यासाठी शेतकरी लगबग करत आहेत. त्यातच असे चोरीचे प्रकार घडत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details