महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मनमाडसह ग्रामीण भागात कांद्याचे दर ५० ते ६० रुपये किलो - ग्रामीण भागातील कांद्याचे दर

कांद्याला चांगला भाव मिळत आहे, ही गोष्ट चांगली असली, तरी याचा फटका शेतकरी व सर्वसामान्य जनतेला बसत आहे. यामध्ये व्यापारी व दलाल हे कदाचित चढ्या भावाने माल विकत असतील, तर याबाबत शासनाने दखल घ्यावी. तसेच लवकरात लवकर वाढत असलेले भाव नियंत्रणात आणावेत, अशी मागणी केली जात आहे.

manmad and rural area onion rates
मनमाडसह ग्रामीण भागात कांद्याचे दर ५० ते ६० रुपये किलो

By

Published : Dec 4, 2019, 8:28 PM IST

नाशिक -मुंबईसह इतर मोठ्या शहरात कांद्याने प्रति किलो शंभरी पार केली आहे. दुसरीकडे मात्र लहान शहरात कांदा 50 ते 60 रुपये किलो दराने मिळत आहे. त्यामुळे मोठ्या शहरात कांदा दरवाढीला दलाल आणि नफेखोरी करणारे जबाबदार असल्याचे समोर येत आहे. शासनाने चौकशी करावी व सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे.

मनमाडसह ग्रामीण भागात कांद्याचे दर ५० ते ६० रुपये किलो

लहान शहरात कांदा स्वस्त असताना देखील मोठ्या शहरात त्याचे भाव गगनाला का भिडले आहेत? याचा तपास केला असता लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यात कांद्याचे भाव हे ३ प्रतवारी नुसार ठरवले जातात. व्यापारी चांगला कांदा जास्तीत जास्त दराने खरेदी करतात. मध्यम दर्जाचा कांदा सरासरी, तर हलक्या प्रतवारीचा कांदा हा कमीतकमी कमी भावाने खरेदी केला जातो. चांगला कांदा परदेशात आणि देशातील इतर राज्यात पाठविला जातो. मध्यम दर्जाचा कांदा हा राज्यातील मुंबईसह इतर मोठ्या शहरात, तर हलक्या प्रतीचा कांदा छोट्या शहरापासून ग्रामीण भागात विकला जातो. सध्या बाजार समितीत लिलावासाठी आलेल्या कांद्यापैकी 2 ते 5 टक्के कांद्याला जास्तीत जास्त भाव मिळत आहे. उर्वरित सर्व कांदा हा सरासरी 7 हजार रुपये आणि कमीतकमी 2 हजार रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केला जात आहे.

हे वाचलं का? -कांद्याला विक्रमी भाव मिळूनही उत्पन्न नसल्याने खर्चही निघेना; शेतकरी हवालदिल

सध्या बाजार समित्यांमध्ये येणारा कांदा हा मध्यम व हलक्या प्रतीचा आहे. त्याला भाव देखील सरासरी 7 हजार ते कमीत कमी 2 हजार रुपये मिळत आहे. हाच कांदा लहान शहरापासून मोठ्या शहरात पाठविला जात आहे. लहान शहरात हा कांदा 50 ते 60 रुपये किलो दराने मिळत असताना मुंबईत मात्र 100 ते 125 रुपये किलो दराने का विकला जात आहे? याचा तपास शासनाने करावा, अशी मागणी सर्वसामान्य जनता करीत आहे.

हे वाचलं का?-सोलापुरात कांद्याचे भाव भिडले गगनाला; 15 हजार रुपये प्रतिक्विंटलचा मिळाला दर

कांद्याला चांगला भाव मिळत आहे, ही गोष्ट चांगली असली, तरी याचा फटका शेतकरी व सर्वसामान्य जनतेला बसत आहे. यामध्ये व्यापारी व दलाल हे कदाचित चढ्या भावाने माल विकत असतील, तर याबाबत शासनाने दखल घ्यावी. तसेच लवकरात लवकर वाढत असलेले भाव नियंत्रणात आणावेत, अशी मागणी केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details