महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अतिवृष्टीमुळे कांदा उत्पादन घटले; देशभरात भाव वाढणार? - nashik onion

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात कांद्याचे नुकसान झाले आहे. परिणामी देशात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली या राज्यातील किरकोळ बाजारात कांद्याचा ५० रूपये किलो भाव झाला आहे.

अतिवृष्टीमुळे कांदा उत्पादन घटले, पुढील पंधरा दिवस भाव वाढलेलेच

By

Published : Sep 24, 2019, 5:00 PM IST

नाशिक - महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात कांद्याचे नुकसान झाले आहे. त्यामूळे देशात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली या राज्यातील किरकोळ बाजारात कांद्याचा भाव ५० रूपये, तर राज्यातही ३८ ते ४० रू किलोने कांदा विकला जात आहे.

हेही वाचा - २५ वर्षांपासून पिंपळखुटा गावाची वाट बिकट; आमदारांचे 'चैनसुख' उडवण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

काद्यांचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने (बफर स्टॉक) साठवलेला 50 हजार टन कांदा बाजारात आणणार असल्याचे सांगितले आहे. केंद्राने राज्यांना केंद्रीय बफर स्टॉक म्हणून कांदा उचलण्याची सूचना दिल्या आहेत. यासाठी दिल्ली, त्रिपुरा आणि आंध्रप्रदेश या राज्याने प्रतिसाद दिला आहे. तसेच कांद्यावरील किमान निर्यात मूल्यात वाढ करून अघोषित निर्यात बंदी करण्यात आली आहे.

हेही वाचा - भरधाव वाहनाने मायलेकीला चिरडले; 6 वर्षीय चिमुकली ठार

नाशिक जिल्ह्यात कांदा प्रति क्विंटल ३८०० ते ४००० रुपये दराने विकला जात असून, पुढील पंधरा दिवस हाच भाव राहील असे हिरामण परदेशी या कांदा व्यापाऱ्याने सांगितले.

हेही वाचा - पुण्यात भाजपचा पश्चिम महाराष्ट्र विजय संकल्प मेळावा; उदयनराजेंची दांडी

ABOUT THE AUTHOR

...view details