महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

येवल्यातील अंदरसूल बाजार समिती तीन दिवस राहणार बंद; कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत - अंदरसूल बाजार समिती न्यूज

कांदा बाजारात वेळीच लिलाव सुरळीत सुरू राहणे आवश्यक आहे. मात्र अंदरसूल कांदा मार्केट तीन दिवस बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांनी कांदाविक्री कोठे करायची, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

अंदरसूल बाजार समिती
अंदरसूल बाजार समिती

By

Published : Sep 7, 2020, 6:45 PM IST

Updated : Sep 7, 2020, 8:06 PM IST

येवला ( नाशिक ) - कोरोना महामारीत कांद्याला भाव मिळत नसताना शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. अंदरसूल कांदा मार्केट सलग तीन दिवस (८ ते १० सप्टेंबर) बंद राहणार आहे.

येवला तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण कांदाविक्रीवर अवलंबून आहे. कोरोना महामारीमुळे बाजारपेठेत कांद्याला मागणी नसल्याने कांद्याचे दर कमी राहिले आहेत. दुसरीकडे, सततच्या अवकाळी पावसाने वातावरणात थंडावा तयार झाला आहे. अशा वातावरणात शेतकऱ्यांनी भाववाढीच्या आशेने चाळीत साठवलेला उन्हाळ कांदाही खराब होत आहे. हा कांदा बाजारात वेळीच विकण्यासाठी लिलाव सुरळीत सुरू राहणे आवश्यक आहे. मात्र अंदरसूल कांदा मार्केट तीन दिवस बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांनी कांदा विक्री कोठे करायची, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

येवल्यातील अंदरसूल बाजार समिती

हेही वाचा-'भारताच्या जीडीपीतील घसरण ही प्रत्येकासाठी धोक्याची घंटा'

कांद्याच्या भावात सुधारणा होत असतानाच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे मार्च, एप्रिल महिन्यापासून चाळीत साठवलेल्या कांदा खराब होऊ लागला. तर लाल कांद्याच्या पिक लागणीची लगबग सुरू झाली आहे. अवकाळी व सोसाट्याचा वाऱ्याने शेतकऱ्याच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. मका, बाजरी, कपाशी, मूग, टोमॅटो व इतर भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याने पिकासाठी खर्च केलेले भांडवलही त्यातून निघू शकत नाही. कांदे पिकाव्यतिरिक्त दुसरे पिक घेण्यासाठी शेतकऱ्याला भांडवलाची गरज आहे. त्यासाठी शेतकरी कांदा विक्रीसाठी बाजारात आणत आहेत.

हेही वाचा-कर्जमाफीची अफवा पसरविणाऱ्यांविरोधात कारवाई करा; मायक्रोफायनान्स कंपनीची मागणी

८ व ९ सप्टेंबरला व्यापारी अर्जावरून कांदा लिलावासाठी मार्केट बंद राहणार आहे. तर १० सप्टेंबरला आठवडे बाजार असल्याने कांदा मार्केट बंद राहणार आहे. कांदा मार्केटमधील लिलाव ११ सप्टेंबरपासून नियमितपणे सुरू होणार असल्याची माहिती अंदरसूल कृषी उत्पन्न उपबाजार समितीचे सभापती मकरंद सोनवण यांनी दिली आहे.

Last Updated : Sep 7, 2020, 8:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details