नाशिक -लॉकडाऊनच्या भीतीने शेतकऱ्यांनी साठवलेला कांदा विक्रीला काढल्याने लासलगाव बाजार समितीत आवक वाढल्याने कांदा दर गडगडले. शनिवारी चारशे ते नउशे रुपये क्विंटल कांदा विकला जात आहे.
एकाच दिवसात तब्बल 32 हजार क्विंटल कांद्याची आवक -

कोरोना संसर्गाच्या विस्फोटामुळे राज्यात लॉकडाउनची शक्यता व्यक्त केली जात असल्याने आशियातील सर्वात मोठी कांद बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत कांद्याचे दर कोसळल्याचे पहायला मिळाले आहेत. एकाच दिवसात तब्बल 32 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली आहे, परिणामी कांद्याचा दर 4 ते 9 रुपये किलो इतका घसरला आहे.
400 ते 900 रुपये प्रति क्विंटल कांदा जात आहे विकला -
गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने येत्या दोन एप्रिल पर्यंत ही परिस्थिती नियंत्रणात न आल्यास लॉकडाऊन करण्याचा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला. यामुळे लॉकडाऊन लागण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला लाल कांदा विकायला काढण्यास सुरवात केली आहे. यामुळे शनिवारी नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये विक्रमी लाल कांद्याची आवक झाली होती. तब्बल 32 हजार क्विंटल कांद्याची आवक झाल्याने कांद्याचे दर 4 ते 9 रुपये किलोपर्यंत घसरले होते. सध्या जिल्ह्यातील सर्वच बाजार समिती कांद्याची आवाक वाढली असुन बाजार समितीत 400 ते 900 रुपये प्रति क्विंटल कांदा विकला जात आहे.