महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कष्टाने पिकवलेल्या कांद्याला कवडीमोल भाव; शेतकरी हवालदिल

कांद्याला लागणारा खर्च निघेल, इतका भाव मिळायला हवा. मात्र, कोरोनामुळे सर्व ठिकाणी काम बंद आहे. मागणी कमी आणि माल जास्त असल्याने कांद्याला भाव मिळत नाही. नाफेडने आमचे कांदे खरेदी करावे आणि आमच्या पिकाला किमान 1200 रुपये भाव द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

मनमाड बाजार समिती नाशिक
कांदा विक्री

By

Published : Apr 30, 2020, 5:35 PM IST

मनमाड (नाशिक) - मनमाड बाजार समितीत कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली असून कांद्याचे दर प्रति किलो 5 रुपयांवर येऊन ठेपले आहेत. आज (गुरुवार) कांद्याला सरासरी प्रति क्विंटल 500 ते 550 रुपये इतका भाव मिळाला आहे. मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समितीत देखील कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांद्याला मातीमोल भावात विकावे लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

कष्टाने पिकवलेल्या कांद्याला कवडीमोल भाव; शेतकरी हवालदिल

हेही वाचा...एकही रुग्ण तपासणी आणि उपचाराविना रुग्णालयातून परत जाता कामा नये : मुख्यमंत्री

कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. कष्टाने पिकवलेल्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. 'सध्या मिळत असलेल्या भावात आमचे उत्पादन शुल्क देखील निघत नाही' असे शेतकरी सांगत आहेत. मात्र, हा कांदा साठवून ठेवू शकत नसल्याने मिळत असलेल्या भावात कांदा विक्री करुन मोकळे होऊ, असे काही शेतकरी सांगत आहेत.

कांद्याला लागणारा खर्च निघेल, इतका भाव मिळायला हवा. मात्र, कोरोनामुळे सर्व ठिकाणी काम बंद आहे. मागणी कमी आणि माल जास्त असल्याने कांद्याला भाव मिळत नाही. नाफेडने आमचे कांदे खरेदी करावे आणि आमच्या पिकाला किमान 1200 रुपये भाव द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details