महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Onion Price: बळीराजा पुन्हा संकटात; कांदा निर्यात शुल्क रद्द, मात्र निर्यात मूल्यात वाढ... - Onion News

Onion Price : गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर गगनाला भिडत आहेत. परंतु आज कांद्याला भाव मिळत आहे. भविष्यात कांदा (Onion News) कधी येईल हे सांगता येत नाही. मात्र केंद्र सरकारने कांद्याला लावलेला 800 डॉलर निर्यात मूल्य रद्द करावा. जेणेकरून व्यापारी वर्गाला व्यापार करता येईल परिणामी शेतकऱ्यांना देखील दोन पैसे मिळतील अशी मागणी शेतकरी करत आहे.

Onion Export
कांदा निर्यात

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 29, 2023, 9:36 PM IST

माहिती देताना शेतकरी पुंडलिक कातकडे

नाशिक (मनमाड)Onion Price: केंद्र शासनाने कांद्यावर लावलेला 40 टक्के निर्यात शुल्क रद्द केला, मात्र निर्यात मूल्यातील प्रति टन 400 डॉलरवरून 800 डॉलर केलेली वाढ कायम ठेवली. त्यामुळे निर्यात शुल्क रद्द केल्याचा काहीही फायदा होणार नाही. केंद्र शासनाने निर्यात शुल्क रद्द करून एका हाताने दिलं आणि निर्यात मूल्यात वाढ करून दुसऱ्या हातानं काढून घेतलं अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गानी दिली आहे.


निर्यातमूल्य कमी करण्याची मागणी : केंद्र सरकारने कांद्यावर लावलेला 40 टक्के निर्यात शुल्क रद्द केला. मात्र प्रति टन 400 डॉलर असलेले निर्यातमूल्य प्रति टन 800 डॉलर केला. यामुळे एक हाताने दिलं आणि दुसऱ्या हातानं डबल घेतलं असं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आहे. आता कुठेतरी कांद्याला चांगला भाव मिळत होता, भविष्यात कांदा कधी येईल याची खात्री नाही. शेतकऱ्यांना साठवलेल्या कांद्यात थोडे पैसे मिळाले असते, मात्र त्याचा काही फायदा होणार नाही. यामुळे केंद्र सरकारने निर्यातमूल्य कमी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकरी आर्थिक अडचणीत : देशांतर्गत कांद्याच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्यानं लासलगावसह सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरामध्ये वाढ होत आहे. घाऊक बाजारात कांदा पाच हजार रुपये क्विंटलच्यावर जाताच केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने कांद्याच्या निर्यातमूल्य डॉलरमध्ये वाढ करत प्रति मेट्रिक टन 400 डॉलरवरून 800 डॉलर केले. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणी सापडणार आहे.

कांद्याच्या निर्यात मूल्य वाढीचा शेतकऱ्यांकडून विरोध :येवल्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून विरोध होताना दिसत आहे. लासलगाव बाजार समितीत (Lasalgaon Market) कांद्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशीही घसरण सुरूच असून दोन दिवसात सरासरी भावता क्विंटल मागे 475 रुपयांची घसरण झाली आहे. दोन दिवसापूर्वी ज्या कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 5300 रुपये इतका भाव मिळत होता. त्याच कांद्याला 4800 रुपये भाव मिळाला आहे. निर्यात मूल्यात वाढ केल्यामुळे कांद्याच्या भावात आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर कांद्याच्या दरात घसरण सुरु झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.



हेही वाचा -

  1. Strike of Onion Traders : कांदा व्यापाऱ्यांच्या बेमुदत बंदचा शेतकऱ्यांना फटका; नाशिकातील सर्व बाजार समित्या बंद
  2. Onion Market : कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क; सर्व बाजार समित्या राहणार बेमुदत बंद
  3. Stored onion rots : नाशिकमध्ये अभोण्यात शेतकऱ्याने 70 ट्रॉली कांद्यावर फिरवला रोटर, शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी

ABOUT THE AUTHOR

...view details