मनमाड(नाशिक) - मनमाडसह नाशिकच्या बहुतांश बाजार समित्यात कांद्याच्या भावाला लागली उतरती कळा लागली आहे. दोन दिवसात प्रती क्विंटल जास्तीत जास्त 1400 रुपयांनी भाव कोसळले आहेत. ऐन सणासुदीच्या काळात भावात मोठी घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला. तर दुसरीकडे दिवाळीच्या तोंडावर कांद्याचे भाव उतरू लागल्याने सर्वसामान्य नागरिकांनमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून वाढलेल्या कांद्याच्या भावाला उतरतीकळा लागली असून मोठी घसरण सुरू झाली आहे. मनमाड बाजार समितीत दोन दिवसात कांद्याच्या भावात सरासरी प्रति क्विंटल तब्बल 1 हजार रुपयांची तर जास्तीतजास्त 1 हजार 400 रुपयांची घसरण झाली आहे. दोन दिवसा पूर्वी ज्या कांद्याला सरासरी भाव 4500 मिळाला होता त्याच कांद्याला आज 3500 रुपये भाव मिळाला आहे.
कांद्याच्या भावात मोठी घसरण शेतकरी हवालदिल-
नाशिक जिह्यातील बहुतांश बाजार समित्यात हीच परिस्थिती असून 100 ते 120 रुपये किलोवर गेलेला कांदा 35 रुपये किलोवर आला आहे. दोन महिन्या पासून कांद्याला चांगला भाव मिळत होता. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळात होता. मात्र ऐन सणासुदीच्या दिवसात भावात मोठी घसरण होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
विदेशी कांद्याचा फटका-
मध्यंतरी कांदा लिलाव बंद पडल्याने आणि अतिवृष्टीमुळे कांद्याचे भाव गगनाला भिडलेले होते. त्यानंतर राज्य सरकारच्या मध्यस्थीने कांद्याचे लिलाव पूर्ववत झाले. त्यानंतर मात्र, भावात घसरण होऊ लागली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. भाव गडगडण्याचे मुख्य कारण म्हणजे केंद्र सरकारने इतर देशातून केलेली कांद्याची भरमसाठ आयात व देशातील राजस्थान व इतर भागातील कांद्याची वाढलेली आवाक यामुळे मागणी कमी व आवक जास्त झाल्याने कांद्याच्या भावात घसरण झाली आहे.
हेही वाच - चाळीसगाव बाजार समितीत आवक वाढल्याने कांद्याच्या भावात घसरण, कांदा उत्पादक हवालदिल