येवला (नाशिक)- येवला व अंदरसूल बाजार समितीत कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. शनिवारच्या तुलनेत आज सरासरी भावात क्विंटल मागे 400 ते 700 रुपयांची घसरण झाली. कांद्याला आज सरासरी 3 हजार ते 3 हजार 300 भाव मिळत आहे. शनिवारी कांद्याला सरासरी 3700 रुपये भाव मिळाला होता.
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती शनिवारच्या तुलनेने आज क्विंटलमागे 400 रुपयांची घसरण झाली आहे. कांद्याला सरासरी 3 हजार 300 रुपये भाव मिळाला आहे. अंदरसूल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारच्या तुलनेने क्विंटल मागे 700 रुपयांची घसरण झाली आहे.
कांद्याच्या किमतीत घसरण झाल्याने शेतकरी हवालदिल-
कांद्याला प्रति क्विटंल सरासरी 3 हजार रुपये भाव मिळाला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कांद्याचे भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यातदेखील कांद्याचे भाव कोसळले आहेत. अंदरसुल येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीत कांदा आवक वाढल्याने गेटच्या बाहेरपर्यंत ट्रॅक्टरच्या रांगा लागल्याचे दिसून आले.
हेही वाचा-नाफेडकडून १५ हजार टन कांद्याच्या आयातीकरता निविदा; २० नोव्हेंबरपर्यंत पुरवठा होणार