नाशिक- शेतकऱ्यांचा कांदा 20 रुपये प्रति किलो दराने खरेदी करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने राज्यव्यापी पत्र आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यभरातून एक लाख पत्र पाठवण्यात येणार आहेत. आज देवळा तालुक्यातील सुभाषनगर गावातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग घेतला. गावातील शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रे पाठवली आहेत.
सुभाषनगर येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा राज्यव्यापी पत्र आंदोलनात सहभाग; नरेंद्र मोदींना लिहिली पत्रे - नरेंद्र मोदींना शेतकरी पत्र
सध्या पाच ते सहा रुपये प्रति किलो दराने कांद्याची विक्री होत असल्याने कांदा उत्पादकांचा उत्पादन खर्चही भरून मिळणे कठीण झाले आहे. यामुळे शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात हे पत्र आंदोलन सुरू आहे.
सध्या पाच ते सहा रुपये प्रति किलो दराने कांद्याची विक्री होत असल्याने कांदा उत्पादकांचा उत्पादन खर्चही भरून मिळणे कठीण झाले आहे. यामुळे शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. सरकार विरोधात कांदा उत्पादकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात हे पत्र आंदोलन सुरू आहे.
राज्यभरातील कांदा उत्पादकांचे नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा कांदा वीस रुपये किलो दराने खरेदी करावा, अशी मागणी पत्रांच्या माध्यमातून करण्यात आली. यावेळी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे ग्रामीण नाशिक जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे, तालुका सरचिटणीस भगवान जाधव, कुबेर जाधव, हरिश्चंद्र आहेर, योगेश भदाणे, जनार्दन जाधव, एकनाथ आहेर, दौलत खैरे, दीपक पवार, दशरथ पुरकर, दीपक पगार, योगेश पुरकर, दत्तू नवले, भालचंद्र आहेर, नाना मगर, भाऊसाहेब भदाणे, शरद आहेर, संदीप आहेर, बाळासाहेब खैर, राहुल मगर, आदी कांदा उत्पादक शेतकऱयांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले.