येवला ( नाशिक) -येवला तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शेतकरी रात्रीच्या वेळी कांदा लागवड करत आहेत. दिवसा मजूर मिळत नसल्याने रात्रीची कांदा लागवड करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे .
मजुरांअभावी रात्री कांदा लागवड....
तालुक्यात अनेक ठिकाणी मजुरांअभावी कांदा लागवड बाकी आहे. कांद्याची रोपे महागड्या दराने घेतलेली असल्याने कांदा लागवड होणे गरजेचे आहे. त्यामुळे वेळीच ही रोपे लावली जात आहेत. रात्रीच्या वेळी आठ ते बारा वाजेपर्यंत कांदा लागवडीचे काम सध्या येवल्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी चालू आहे.