नाशिक - मागीलकाही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. सटाणा तालुक्यातील शेतकऱ्यांचा कांदा सडायला सुरुवात झाल्यामुळे आता लाखोंचे नुकसान झाल्याचे समोर येत आहे.
काही महिन्यांपूर्वी केंद्र शासनाने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लागू केल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. यातच आयकर विभागाच्या वतीने कांदा व्यापाऱ्यांवर छापेमारी करण्यात आली. लासलगावसह विविध ठिकाणी कांदा लिलाव देखील बंद ठेवण्यात आले होते. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असताना आता पुन्हा एकदा परतीच्या पावसामुळे कांदा भिजल्याने चाळीतील कांदा सडायला सुरुवात झाली आहे.