येवला (नाशिक) - येवला तालुक्यातील अंदरसुल कृषी उत्पन्न उपबाजार समितीत गेल्या काही दिवसापासून कांद्याची आवक वाढली आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत लिलाव चालू असल्याकारणाने मोबाईलची लाईट तसेच बॅटरी लावून कांदा लिलाव व्यापारी करत आहेत.
कांदा व्यापारी सुनील अट्टल हेही वाचा -राष्ट्रीय कब्बडी स्पर्धेवेळी प्रेक्षक गॅलरी कोसळून 150 पेक्षा अधिक जण जखमी
मोबाईलच्या लाईट लावून कांदा लिलाव
येवला तालुक्यातील अंदरसुल कृषी उत्पन्न उपबाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून कांद्याची आवक वाढली असल्याने आलेले पूर्ण ट्रॅक्टर्स लिलावासाठी काढण्यासाठी अक्षरशा वेळ होत असल्याकारणाने रात्री अंधार पडल्याने आपल्या मोबाईलच्या लाईट लावून तसेच बॅटरी लावून लिलाव व्यापारी काढत असल्याचे चित्र सध्या अंदरसुल बाजार समितीत दिसून येत आहे .
रात्र झाली तरी लिलाव चालू
गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे .त्यामुळे शेतकरी आपला कांदा बाजार समितीत आणत आहे .मात्र रात्रीच्या वेळी कांदा ट्रॅक्टर मार्केटमध्ये न राहता त्वरित कांदा लिलाव व्हावा म्हणून रात्र झाली तरी देखील लिलाव चालू ठेवून कांदा लिलाव बॅटरी व मोबाईलच्या लाईट वर व्यापारी करत आहे.
हेही वाचा -अरे बाबा, मी हॉस्पिटलमध्येच होतो... अनिल देशमुखांनी दिले स्पष्टीकरण