महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

येवला बाजार समितीत कांद्याचा लिलाव बेमुदत बंद - कांद्याचा लिलाव बेमुदत बंद नाशिक बातमी

गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. जोरदार पावसानं शेतकऱ्यांच्या कांदा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दुसरीकडे केंद्र शासनाने कांदा साठवणुकीवर निर्बंध आणल्यामुळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.

येवल्यात कांद्याचा लिलाव बेमुदत बंद
येवल्यात कांद्याचा लिलाव बेमुदत बंद

By

Published : Oct 26, 2020, 5:29 PM IST

नाशिक - कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने अगोदर निर्यातबंदी, कांदा व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाचे छापे, कांदा आयात करणे आणि आता कांदा साठवणुकीवर व्यापाऱ्यांना मर्यादा घातल्याने व्यापाऱ्यांसह कांदा उत्पादकांमध्ये कमालीची नाराजी निर्माण झाली आहे. यामुळे, येवला बाजार समितीमध्ये कांद्याचा लिलाव बेमुदत बंद करण्यात आला आहे.

येवल्यात कांद्याचा लिलाव बेमुदत बंद

येवला बाजार समितीचे कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्यात आले आहे. केंद्र सरकारने कांदा साठवणूकीवर व्यापाऱ्यांना मर्यादा घातल्याने हा कांदा लिलाव बंद ठेवण्यात आला असून केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा साठवणूकीवर मर्यादा घालत घाऊक व्यापाऱ्यांना 25 टनांपर्यंत तर किरकोळ व्यापाऱ्यांना दोन टनांपर्यंत कांदा साठवता येणार आहे. त्यामुळे अगोदरच व्यापाऱ्यांकडे काही प्रमाणात कांदा असल्याने अजून कांदा खरेदी केला तर तो ठेवावा कुठे, व कांदा खरेदी केला व साठवणूक सापडला तर सरकार आमच्यावर गुन्हे दाखल करेल असे व्यापाऱ्यांचे म्हणणे असल्याने कांदा लिलाव हे बंद ठेवण्यात आले आहे. या बंदमुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत असून कांदा विकावा कुठे असा प्रश्न शेतकऱ्यानं पडला आहे.

गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. जोरदार पावसानं शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर, दुसरीकडे केंद्र शासनाने कांदा साठवणुकीवर निर्बंध आणल्यामुळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.

हेही वाचा -मनमाड : तलावात अंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details