नाशिक - जनरल वैद्यनगरमधील वृंदावन कॉलनीतील इस्कॉनच्या श्री श्री राधा-मदनगोपाल मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठेला आठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तीनदिवसीय प्राणप्रतिष्ठा महोत्सव साजरा करण्यात येत असून, शनिवारी सायंकाळी मूर्तींना पुष्पांची आकर्षक सजावट करून एक टन गुलाब पुष्पांच्या पाकळ्यांचा अभिषेक करण्यात आला.
इस्कॉन मंदिरात एक टन पुष्पांचा अभिषेक - nashik
जनरल वैद्यनगरमधील वृंदावन कॉलनीतील इस्कॉनच्या श्री श्री राधा-मदनगोपाल मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठेला आठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तीनदिवसीय प्राणप्रतिष्ठा महोत्सव साजरा करण्यात येत असून, शनिवारी सायंकाळी मूर्तींना पुष्पांची आकर्षक सजावट करून एक टन गुलाब पुष्पांच्या पाकळ्यांचा अभिषेक करण्यात आला.
![इस्कॉन मंदिरात एक टन पुष्पांचा अभिषेक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2783927-239-a157e1ff-6cbc-40a0-ba39-e5a194b77c5a.jpg)
नाशिकच्या प्रसिद्ध इस्कॉन मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठेला आठ वर्षे पूर्ण झाल्यामुळे मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तब्बल १ टन पुष्पांनी श्री राधा मदनगोपालजींच्या विग्रहांचा यावेळी अभिषेक करण्यात आला. या महोत्सवाला सकाळी ५ वाजताच्या मंगलमय आरतीने सुरुवात झाली तर सकाळी ७ वाजता विग्रहांचा पंचामृताने अभिषेक करण्यात आला.
या वर्षी १००० किलो विविध पुष्पांच्या पाकळ्यांनी श्री श्री राधा मदनगोपालजींच्या विग्रहांचा अभिषेक करण्यात आला. मोगरा, सर्व प्रकारचे गुलाब, चाफा, झेंडू, सोनचाफा, चमेली, बिजली तसेच वृंन्दावन आणि सोलापूरहून आणलेला देशी गुलाब, बंगलोरहून आणलेले सायली व मोगरा इत्यादी फुलांचा अभिषेकासाठी वापर करण्यात आला. पुष्पांनी तसेच पर्यावरण अनुकूल कागदांनी सजवलेली वेदी नेत्रांना भूरळ घालणारी ठरली. विग्रहांचा सुंदर मनोहर रूप व श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांचे प्रवचन हे ह्या कार्यक्रमाचे विशेष होते. हजारो नाशिककरांनी या नयनरम्य महोत्सवाचा आस्वाद घेतला. यासाठी लासलगाव, धुळे, शिरपूर, मालेगाव, चाळीसगाव, मुंबई या ठिकाणांहून भाविक उपस्थित होते.