महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक बनले कोरोनाचे हॉटस्पॉट; एका दिवसात 1हजार 64 नवे कोरोनाबाधित

मागील चोवीस तासात 1064 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने नाशिक जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 16 हजार 649 वर जाऊन पोहोचली असून ह्यात 11 हजार 218 इतके बाधित रुग्ण नाशिक शहरातील आहे.

 corona patient increase by one thousand in nashik district
corona patient increase by one thousand in nashik district

By

Published : Aug 4, 2020, 10:16 AM IST

नाशिक- मुंबई, पुणे पाठोपाठ आता नाशिक शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. नाशिक जिल्ह्यात 3 ऑगस्ट मागील 24 तासात रेकॉर्ड ब्रेक सर्वाधिक 1हजार 64 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून ह्यातील सर्वाधिक 922 रुग्ण हे नाशिक शहरातील आहेत. तर 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

नाशिक जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी 500 ने वाढणारी कोरोनाबाधित रुग्ण संख्या आता एकदम एक हजारवर जाऊन पोहोचली असल्याने नाशिककरांची चिंता वाढली आहे. मागील चोवीस तासात 1064 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने नाशिक जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 16 हजार 649 वर जाऊन पोहोचली असून ह्यात 11 हजार 218 इतके बाधित रुग्ण नाशिक शहरातील आहे. आता कोरोनामुळे 533 जणांचा मृत्यू झाला असून दिलासादायक बाब म्हणजे 11 हजार 781 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यातील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये 4 हजार 335 बाधित रुग्ण उपचार घेत आहे.


मृतांची संख्या
नाशिक ग्रामीण - 127
नाशिक मनपा - 300
मालेगाव मनपा - 86
जिल्हा बाह्य - 20
एकूण नाशिक जिल्ह्यात- 533

नाशिक जिल्ह्याची आतापर्यंतची परिस्थिती
-नाशिक जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्ण 16649
-कोरोनामुक्त -11781
-एकूण मृत्यू -533
-एकूण उपचार घेत असलेले रुग्ण-4335

ABOUT THE AUTHOR

...view details