नाशिक - येवला तालुक्यात एकतर्फी प्रेम प्रकरणातून पुतण्याने काकाला कुर्हाडीने वार करुन ठार केल्याची घटना घडली. पुतण्या मुकेश शेळके याचे त्याच्या काकाच्या पत्नीवर एकतर्फी प्रेम होते. याप्रकरणी अवघ्या दोन तासात संशयित पुतण्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
प्रेमात अडथळा ठरणाऱ्या काकाचा कायमचा काटा काढण्याचे पुतण्याने ठरवले होते. रात्रीच्या सुमारास काकांच्या घरातील लाईट पुतण्या मुकेशने बंद केली. लाईट का बंद झाली आहे, हे पाहण्यासाठी काका घराच्या बाहेरील विजेच्या खांबाजावळ आले असता, अंधारात लपलेल्या मुकेशने काकाच्या डोक्यावर, हातावर कुऱ्हाडीने वार केले. त्यामुळे काका आरडा-ओरड करत खाली कोसळले, त्यावेळी मुकेशने तेथून पळ काढला.