नाशिक(येवला) - जिल्ह्यात मालेगावनंतर आता येवला शहरातही कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. आज येवला शहारात एका 27 वर्षीय नर्सचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे येवल्यात कोरोना बाधितांची एकूण रुग्ण संख्या 9 वर पोहचली आहे. शहरालगत बाभुळगाव येथे विलगीकरण कक्ष उभारण्यात आला असून या कक्षात 79 व्यक्तींना ठेवण्यात आले आहे .तर कोरोना केअर सेंटरमध्ये 2 रुग्ण दाखल आहेत.
येवल्यात आणखी एक परिचारिका कोरोनाबाधित; रुग्णांची संख्या ९ वर - कन्टेनमेंट झोन
येवला शहारात एका 27 वर्षीय नर्सचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे येवल्यात कोरोना बाधितांची एकूण रुग्ण संख्या 9 वर पोहचली आहे. शहरालगत बाभुळगाव येथे विलगीकरण कक्ष उभारण्यात आला असून या कक्षात 79 व्यक्तींना ठेवण्यात आले आहे .तर कोरोना केअर सेंटरमध्ये 2 रुग्ण दाखल आहेत.
आजपासून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत उघडण्यात यावे, असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. यात किराणा दुकान, भाजीपाला दुकाने सकाळी 10 ते 4 या वेळेत आणि मेडिकल व खासगी दवाखाने पूर्णवेळ उघडे ठेवावे, असे सूचना प्रशासनाच्यावतीने देण्यात आल्या आहेत.
रूग्ण आढळलेल्या भागापासून 3 किलोमीटरचा परिसर कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या कन्टेनमेंट झोनमध्ये ग्रामीण भागातील कोणी व्यक्तीने प्रवेश करू नये, अशा प्रकारचा आदेश प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे. नारिकांनी योग्य खबरदारी घेण्याची आणि काळजी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.